इंद्रपाल कटकवार
भंडारा : आधुनिक जीवनशैलीत मनुष्याचे राहणीमान चांगलेच बदलून गेले आहे. सकाळी उठण्यापासून ते रात्री निजण्यापर्यंतच्या सवयी बदलल्याने शारीरिक व्याधीही वाढल्या आहेत. त्यातच अस्थी रुग्णांच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. विशेषत: पायी चालण्याची सवय कमी हाेत गेल्याने गुडघा, कंबरदुखी यासह अन्य आजारही वाढले आहेत.
सद्य:स्थितीत विविध कारणांमुळे अनेकांची चालायची सवय पार माेडली आहे. त्याचा विपरीत परिणाम शरीरावर हाेत आहे. अगदी चार पावले जाण्यासाठीही वाहनाचा आधार घेतला जाताे. याचा परिणाम शरीरातील अवयवांवर हाेऊन व्याधी उत्पन्न हाेते. शरीराकडेही सातत्याने दुर्लक्षपणा हाच व बदलत्या सवयीमुळे त्याचा सरळ फटका आराेग्यावर हाेत आहे. लहान ते माेठ्यांपर्यंतच्या इसमांनाही आता हाडांचे आजार उद्भवत आहेत.
म्हणून वाढले हाडाचे आजार
लहान सहान कामांसाठी वाहनांचा वापर केला जाताे. पायी चालण्याची सवय अक्षरश: माेडली गेली. वेळ वाचताे म्हणून हाडांच्या समस्येकडेही सर्रास दुर्लक्ष हाेत आहे.
काेट
मानवी शरीरातील वयाेमानानुसार हाडांची झीज हाेत असते. ही एक नैसर्गिक प्रक्रियासुद्धा आहे. पायी चालणे हे सर्वाेत्तम आहार आहे. मात्र, या व्यायामाकडे सर्वांचेच दुर्लक्ष हाेत आहे. ‘वाॅकिंग इज द बेस्ट पाॅलिसी फार ह्युमन बाॅडी’ हे तत्त्व अंगीकारून सर्वच वयाेगटातील व्यक्तींनी याचे पालन केले पाहिजे. विशेषत: ज्येष्ठांनी पायी चालण्यावरच भर द्यावा. ज्यांना पायी चालणे शक्य नाही त्यांनी साध्या व्यायामाचा आधार घ्यावा.
- डाॅ. मिलिंद देशकर,
अस्थिराेगतज्ज्ञ, भंडारा