कोदुर्ली : पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील शेतशिवारामध्ये गोसेखुर्दचा उजवा कालवा आहे. त्या कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनसुद्धा होते. नहराच्या पाळीतून शेतात पाणी झिरपत असल्याने पिक घेता येणे कठिण झाले आहे नाही. शेतामध्ये नेहमी पाणी साचत असल्याने जमीन ही दलदल झाली आहे. या दलदलीमुळे शेतामध्ये साधी बैलजोडी असो व मग ट्रॅक्टर असो नेताच क्षणी बांधामध्ये फसतो. त्यामुळे नांगरणी, वखरणी करणे अवघड झाले आहे. शेतामध्ये धानाचे पीक घ्यायचे म्हटले तर चिखलणी करावी लागते. परंतु ट्रॅक्टर वा बैलजोडी फसत असेल तर चिखलणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. कार्यकारी अभियंता गोसीखुर्द उजवा कालवा वाही यांना या पाण्याविषयी अर्ज निवेदन देत आहेत. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी गप्प आहेत. शेतामध्ये नेहमी पाणी राहिला तर आयुष्यभरासाठी शेती सोडावी तर लागणार नाही. असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. याच शेताच्या भरवशावर शेतकरी परिवार चालवित असतात. परंतु शेतात पाणी साचत राहिला तर उपासमारीची पाळी आल्याचे शेतकरी मनोहर आकरे, भगवान रामटेके, विनोद हटवार, मच्छिंद्र हटवार, रामकृष्ण देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, रमेश हटवार यांनी निवेदनातून व्यथा मांडली आहे. (वार्ताहर)
नहराच्या पाण्यामुळे शेतकरी हवालदिल
By admin | Published: June 26, 2016 12:27 AM