शरीराला आवश्यक असलेली विविध प्रकारची व्हिटॅमिन, मिनरल याशिवाय प्रोटिन मिळणे गरजेचे आहे. मात्र, शरीरातील उपरोक्त पदार्थांचे प्रमाण कमी होत गेल्यास डोक्यावरील केसही आपोआप गळू लागतात. यावर काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोविडनंतर तीन महिन्यांनी गळू लागतात केस
कोविड झालेल्या काही रुग्णांबाबत डोक्यांवरील केस गळण्याचे उदाहरणे समोर आली आहेत. तीन महिन्यांनंतर डोक्यावरील केस गेल्याने आता त्या व्यक्ती उपचार करीत आहेत. औषधांचे अतिरिक्त सेवनही याला कारणीभूत ठरले आहे.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
कोविडमुळे अनेकांच्या विचारसरणीवरही प्रभाव जाणवत आहे. अशा स्थितीत स्वत:ला मानसिक आरोग्यात ढकलण्यापेक्षा त्यातून बाहेर निघणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच काही घरगुती उपाय करणेही गरजेचे आहे. पूर्वीच्या काळातील आजीच्या बटव्यातील घरगुती उपाय करणे अत्यंत सोपे आहे.
किंबहुना संतुलित आहाराच्या माध्यमातून शरीरातील प्रोटिन व्हिटॅमिन व मिनरल्सचे प्रमाण अबाधित ठेवणेही महत्त्वाचे आहे. कुठलाही स्ट्रेस न बाळगता योग व प्राणायामावरही भर देणे गरजेचे आहे. पारंपरिक पदार्थ खाण्याकडे कल अधिक देत फास्ट फूड खाणे टाळणे गरजेचे आहे.
अतिरिक्त ताण आणि औषधांच्या सेवनाने डोक्यावरचे केस गेल्याचे रुग्णही आढळले आहेत. यावर फक्त थोडीफार काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील प्रोटिनची मात्रा यथावत राहावी यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. याशिवाय व्हिटॅमिन्स व शरीराला हवी असलेली मिनरल्सची परिपूर्णता होणेही गरजेचे आहे तरच यावर निदान होऊ शकते.
-डाॅ. नितीन तुरस्कर,
अध्यक्ष, आयएमए भंडारा.
हे करा
कुठल्याही बाबतीत अतिरिक्त विचार करणे सोडून द्यावे. जे व्हायचे आहे ते होणारच. त्यावर अतिरिक्त विचार किंवा मत व्यक्त करुन डोक्यावर परिणाम करून घेण्यासारखे आहे.
कोरोनाकाळात अनेक बाबींमुळे ताण सातत्याने वाढत गेला. अशा स्थितीत आतातरी योग, प्राणायामच्या माध्यमातून मनशक्तीवर ताबा मिळविणे गरजेचे आहे.
संतुलित आहार घेणेही आवश्यक झाले आहे. जेणेकरून शरीराला समर्पक मात्रा मिळू शकेल.