कारभार ‘आॅक्सिजन’वर : सामाजिक न्यायमंत्री लक्ष देतील का?देवानंद नंदेश्वर भंडाराछत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जोपासून राज्यशासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यावर कोट्यवधींची तरतुद केली. मात्र, भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परीषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे योजनांचा बट्टयाबोळ झाला आहे. कर्मचाऱ्यांअभावी हे कार्यालय ‘आॅक्सिजन’ वर असून विविध योजनाच्ांी पूर्णत: कामे ठप्प पडली आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील अनुसुचित जाती व जमातीसह इतरच्या लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने अनुसुचित जाती व जमातींच्या विकासासाठी जिल्हा परिषदेसह विशेष समाज कल्याण विभाग सुरू केले. या विभागांच्या माध्यमांतून सामाजिक न्याय विभागाची कामे मोडतात. मात्र, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात १६ मंजूर पदांपैकी ८ पदे रिक्त आहेत. यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह समाज कल्याण निरीक्षकांची ३ पदे, कार्यालय अधिक्षक, सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लिपीक, शिपाई यांची प्रत्येकी एक पद रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कामाचा खोळंबा होत आहे. येथे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांचे पद प्रभारावर आहे. भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील राजकुमार बडोले यांना राज्याच्या सामाजिक मंत्री पदावर वर्णी लागल्याने भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र वर्ष लोटूनही समाजाचे कल्याण मात्र झाले नाही.
समाजकल्याण विभागात अर्ध्याधिक पदे रिक्त
By admin | Published: November 27, 2015 12:50 AM