शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

तुटपुंज्या मानधनावर राबतात हातपंप कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 5:00 AM

महाराष्ट्रात मागील ३५ वर्षापूर्वी विंधन विहिर खोदून त्यावर हातपंप बसविण्याची योजना विस्तृत प्रमाणात आजही सुरु आहे. विंधन विहिरीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सोडविला गेला आहे. तथापि, त्या विहिरीचा पाणी अहोरात्र बाहेर यावा यासाठी राबणारा कामगार आजही वेठबिगार कामगार म्हणून तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहे. ग्रामविकास विभागाच्या ११ सप्टेंबर १९८१ च्या पत्रानुसार १०० हातपंपासाठी एक हातपंप दुरुस्तीस कामगार नेमण्यात आले होते.

ठळक मुद्देआर्थिक स्थितीही बेताची : मोहाडी तालुक्यात आठशेपेक्षा अधिक हातपंप

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे हातपंप दुरुस्त करणारा यांत्रिकी कामगार कायम होईल, या आशेवर जगत आहे. काही कामगारांना या प्रतीक्षेत मरण आले. परंतु जिल्हा परिषदेच्या असंवेदनशील व निर्दयी प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी त्यांना अजूनही ताटकळत ठेवले आहे.महाराष्ट्रात मागील ३५ वर्षापूर्वी विंधन विहिर खोदून त्यावर हातपंप बसविण्याची योजना विस्तृत प्रमाणात आजही सुरु आहे. विंधन विहिरीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सोडविला गेला आहे. तथापि, त्या विहिरीचा पाणी अहोरात्र बाहेर यावा यासाठी राबणारा कामगार आजही वेठबिगार कामगार म्हणून तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहे. ग्रामविकास विभागाच्या ११ सप्टेंबर १९८१ च्या पत्रानुसार १०० हातपंपासाठी एक हातपंप दुरुस्तीस कामगार नेमण्यात आले होते. या कामगारांनी १८ रुपये ९० पैसे पासून काम करणे सुरु केले होते. आता प्रती हातपंप देखभाल दुरुस्तीसाठी १२० रुपये दिले जात आहेत. या कामगारांना केवळ एक रुपये एका दिवसासाठी सायकल भत्ता दिला जात होता.हातपंप दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध करून दिले जायचे. मात्र १९९५ नंतर एक रुपयाचा सायकल भत्ता बंद करण्यात आला. ‘टूल बॉक्स’ देणेही बंद करण्यात आले. आता हे हातपंप कामगार स्वत: च्या साधनाने गावात जातात. स्वत:च रुपये खर्च करून हातपंप दुरुस्तीचे साहित्य घेत असतात. महिन्याला दहा हजार रुपये यावेत यासाठी ग्रामीण भागातील शंभर हातपंपाची देखभाल करायला कामगार धावपळ करित जात असतो.मोहाडी तालुक्यात हातपंपाची संख्या आठशेच्या वर आहे. मोहाडी तालुक्यासाठी आता कामगार केवळ आठच आहेत. जिल्ह्यात आतास्थितीत ४० कामगार आहेत. दहा कामगारांचा मृत्यू झाला. या अस्थायी कामगारांना वय, शिक्षण आदी अटी शिथिल करून सेवेत सामावून घ्यावे असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे तत्कालीन अवर सचिव मोहन पांढरकामे यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३१ डिसेंबर १९९७ ला निर्देश दिले होते. त्यापूर्वी १ डिसेंबर १९९५ ला जलसंधारण विभागाचे उपसचिव सूर्यवंशी यानी रोजंदारी कार्यरत असलेल्या कामगारांना समांतरीत नियमीत आस्थापनेवर आणण्यात यावे सर्व जिल्हा परिषदच्या सीईओ यांना निर्देशित केले होते.पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालयातील तत्कालीन अवर सचिव श.वी. दुवे यांनी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यातिल हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगारांना जिल्हा परिषदेकडून शासकीय सेवेत सामावून घेतले नाही, असे जानेवारी २०१३ ला पुणेच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पत्राचा संदर्भ देवून संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे व उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर यांनी अहवाल मागितला होता .या आधी भंडारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्या ५० कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, आजपर्यंत त्या कामगारांना शासकीय सेवेत कोणत्याही कामगारांना सामावून घेतले गेले नाही. या पैकी दहा जण आतातरी स्थैर्य लाभेल, आपले कुटुंब सुखी होईल या आशेवर मृत्यू पर्यंत प्रतीक्षाच करित राहिले. आता जिल्ह्यातील ४० कामगार निवृत्तीच्या उंबरठ्यावर आली आहेत तरी संवेदनहीन झालेल्या जिल्हा परिषदेला पाझर फूटलेला नाही. आजही हे कर्मचारी स्थायी होवू या आशेवर जीवनाचा गाडा ढकलत आहेत. तथापि, कोणत्याही अधिकाऱ्याना या हातपंप कामगारांनाआतपर्यंत नियमीत करण्यासाठी गांभीर्याने घेतले नाही.घामाचा पैसा खाल्लामागील पदाधिकाऱ्यानी या कामगारांना सेवेत स्थायी करून देतो असे आमिष दाखवले. जिल्ह्यातिल कामगारांकडून पैसाही घेतला पण त्या कर्मचाऱ्याच्या घामाचा पैसा वाया गेला .विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातिल कामगारांना वगळून इतर सर्व जिल्ह्यात हातपंप कामगारांना जिल्हा परिषदेने शासकीय सेवेत सामावून घेतले आहे. पण भंडारा जिल्ह्याशेजारच्या जिल्हा परिषदेनी या कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी वेटिंगवर ठेवले आहे.दिवाळी अंधारातहातपंप दुरुस्त करणाऱ्या सामान्य कामगारांच्या घरची दिवाळी अंधारात गेली. सप्टेंबर महिन्यापासून त्या कामगारांना मानधन देण्यात आले नाही.

टॅग्स :Waterपाणी