पाच लाखांची तरतूद : जालन्याचा प्रयोग राज्यभरभंडारा : स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये 'स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ विद्यालय ' हा उपक्रम सुरु होत आहे. याद्वारे शाळांमध्ये हॅन्डवॉश स्टेशन सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन घेण्याआधी हात धुवावेत. तसेच ते कशा पद्धतीने धुवावेत, याबाबत 'युनिसेफ' ने जालना जिल्ह्यात एक हॅन्डवॉश स्टेशन विकसित केले आहे. याप्रयोगाचा दाखला घेत शिक्षण विभागाने आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये असे स्टेशन उभारण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक शाळेला किमान एक हजार रुपये देण्यात येणार असून त्यातून बांधकाम करावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)काय आहे हँडवॉश स्टेशन?'युनिसेफ' ने कमीत कमी जागेत अधिकाधिक विद्यार्थी चांगल्या प्रद्धतीने हात धूवू शकतील अशी एक संकल्पना मांडली आहे. त्याला हॅन्डवॉश स्टेशन असे नाव देण्यात आले आहे. हात धुण्याच्या सवय पायऱ्या आहेत. हात धुण्यासाठी शाळांनी कोणतीही साधन सामुग्री उपलब्ध करून द्यावी, शाळांना विद्यार्थ्यांचे कसे करावे. सर्व विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी किती वेळ लागेल. अशा सर्व बाबींचा विचार करून शासनाने याबाबत निर्देश दिले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात वैद्यक्तिक स्वच्छतेला महत्व आहे. बालकावर शालेय स्तरापासून स्वच्छतेची सवय रुजण्यास या माध्यमातून मदत होईल. तसेच इतरांनाही याचे अनुकरण करुन सवय लागण्यास मदत होईल. असे हँडवॉश स्टेशन उभारीणचे उद्दीष्ट आहे.
प्रत्येक शाळेत हॅन्डवॉश स्टेशन
By admin | Published: November 28, 2015 1:38 AM