शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘हर्ष’च्या वाढदिवशी हागणदारीमुक्तीचा संदेश

By admin | Published: January 31, 2015 11:13 PM

लहान मुलांचा वाढदिवस म्हटला की, घरातील मोठ्यांची रेलचेल असते. मुलाला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांसह भेटवस्तुची अपेक्षा असते. मात्र तुमसर तालुक्यातील देवरीदेव येथील हर्षकुमारच्या वाढदिवसाला

भंडारा : लहान मुलांचा वाढदिवस म्हटला की, घरातील मोठ्यांची रेलचेल असते. मुलाला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांसह भेटवस्तुची अपेक्षा असते. मात्र तुमसर तालुक्यातील देवरीदेव येथील हर्षकुमारच्या वाढदिवसाला त्याने चक्क वडिल व उपस्थित महिलांकडून शौचालय बांधणीचे अभिवचन घेतले. हर्षच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या कार्यक्रमादरम्यान जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने दिलेल्या जनजागृती संदेशातुन देवरीदेव येथील महिलांनी असा निर्धार केला आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व पंचायत समिती तुमसर गटसाधन केंद्र यांच्यावतीने आंतरव्यक्ती संवाद उपक्रमांतर्गत देवरीदेव येथील ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियान व शौचालय बांधणी याची जनजागृती करण्याच्या दृष्टीने महिलांची सभा ठेवली होती. यात वैयक्तिक शौचालयाचा २०१४-१५ च्या आराखड्यात शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी महिला जनजागृतीसाठी ही सभा २८ जानेवारीला घेण्यात आली होती. या सभेला सरपंचा प्रेरणा उमेश तुरकर, उपसरपंच मुलचंद पारधी, सदस्या निलवंता भागवत, उषा प्रितम नाईक, डिलेश्वरी पटले, शांता पटले, सरिता रिनाईत, शकुंतला रिनाईत, रोजगार सेवक व संगणक तज्ज्ञ उपस्थित होते. सभेदरम्यान गावातील ईश्वरदयाल पटले यांच्या पाच वर्षीय हर्षकुमार याचा वाढदिवस असल्याने लाऊडस्पिकर सुरु होता. हे औचित्य साधून जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, गटसमन्वयक पल्लवी तिडके, समुह समन्वयक शशिकांत घोडीचोर, अनिता कुकडे, हर्षल ढोके यांनी सरपंचा पे्ररणा तुरकर यांच्या माध्यमातून ईश्वरदयाल पटले यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या घरी सुरु असलेल्या कार्यक्रमात शौचालय बांधणीची जनजागृती करण्याचे ठरविले.