भंडारा : पती-पत्नी संसाररुपी गाडीची दोन चाके आहेत. मात्र क्षुल्लक कारणावरून दांपत्यांमध्ये वाद उद्भवतो. पुरुष पत्नीवर जाच करतो, अशी बाब आपल्याला नेहमीच ऐकावयास मिळते. मात्र पुरुषही पत्नीच्या जाचाला कंटाळले आहेत. बायकोकडून छळ होतोय म्हणून गत कोरोना काळात पुरुषांनी १६ तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाकाळात पती-पत्नीमध्ये होत असलेली चिडचिड तसेच पैशांची आर्थिक चणचण संशय, नीट बोलत नाही, आधुनिक राहणीमान या कारणांवरून दांपत्यांमध्ये वाद होत असतात. यासंदर्भात भरोसा सेलकडे दांपत्यांनी तक्रार केली आहे. यात बायकोकडून छळ झाल्याबाबत १६ पुरुषांनी तक्रारी केल्या आहेत.
बॉक्स
कोरोना काळात तक्रारी वाढल्या
पती-पत्नीच्या वादाअंतर्गत भरोसा सेलकडे कोरोनाकाळात ११९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात महिलेची पुरुषांविरुद्ध १०३ तक्रारी असून पुरुषांनी महिलांविरुद्ध १६ तक्रारी करण्यात आल्या आहे. कोरोना काळात तक्रारी वाढल्याचे दिसून येते.
बॉक्स
आर्थिक टंचाई आणि अतिसहभाग
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले. त्यामुळे अनेक पुरुष मंडळी घरी होती. याच वेळी आर्थिक टंचाई भासू लागल्याने पती-पत्नींमध्ये वाद उद्भवला. क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला जाण्याचीही आणि उदाहरणे या निमित्ताने समोर आली.
बॉक्स
पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार
सामान्यतः महिलांच्या बाजूने अनेक कायदे आहेत, असेच मला वाटते. पुरुषांच्या हक्कांसाठी कोण लढणार, असा प्रश्न मला आता सतावत आहे. तक्रार केली म्हणून मी सर्व महिलांच्या विरोधात आहे, असं नाही परंतु दोघांचीही समान बाजू ऐकून घ्यायला हवी. मात्र तसे होत नाही.
-एक पत्नी पीडित.
बॉक्स
हा तर एक प्रकारचा मानसिक छळच
सातत्याने मोबाइल पहात असतात, अशी कारण देऊन पतीसोबत भांडण झाल्याचे दिसून येते. यात कुणीही कोणाचे ऐकून घेत नाही.
एकमेकांच्या वर्तणुकीवर संशय घेत वाद घालण्याचे प्रकार घडतात. विशेषतः याची मानसिक छळ होतो. यातून नैराश्यपणा येत असतो.
सतत भांडणे, आई-वडिलांना भांडणात मधात आणणे, अन्य लहान बाबींवरून मानसिक त्रास देण्याचा प्रकारही पत्नीकडून होत असल्याचे सांगण्यात आले.