नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी ग्रामपंचायत हरदोली येथे आयोजित कार्यक्रमात आयएसओ अधिकारी स्वप्निल मस्के, राहुल मानवतकर यांच्या हस्ते सरपंच सदाशिव ढेंगे, सचिव गोपाल बुरडे यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायतच्या करवसुली, शुद्ध पाणीपुरवठा, सीसीटीव्ही, ग्रामपंचायतचे डिजिटलायझेशन, रेकाॅर्डचे अचूक नियोजन, सामूहिक विवाह सोहळे, गाव आणि ग्रामपंचायत सौंदर्यीकरण, नावीन्यपूर्ण उपक्रम, शेतकरी मेळावे, शाळा व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, मुलींचा जन्म झाल्यास प्रोत्साहन बक्षीस आदी बाबींच्या तपासाअंती हरदोली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले. ग्रामपंचायतीला विस्तार अधिकारी तेलमासरे यांचे मार्गदर्दशन लाभले आहे. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच मनोज झंझाड, पोलीस पाटील पंढरीनाथ झंझाड, उपसरपंच मनोज झंझाड, ग्रामपंचायत सदस्य देव झंझाड, संदीप झंझाड, वच्छलाताई झंझाड, ज्योती झंझाड, हिरा झंझाड, संगीता झंझाड, प्रेमलता झंझाड, परिचर दिगंबर झंझाड, गीता राघोर्ते, गायधने उपस्थित होते. संचालन ग्रामसेवक गोपाल बुरडे यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केले.
कोट
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि गाडगेबाबा आमच्या ग्रामपंचायतीचे आदर्श आहेत. ग्रामगीता आमची प्रेरणास्रोत आहे. गावातील जनतेचा पूर्ण सहभाग, भक्कम पाठपुरावा, ही आमच्या यशाची त्रिसूत्री आहे. या यशाचे सर्व श्रेय ग्रामवासीयांना जाते.
सदाशिव ढेंगे, सरपंच, हरदोली