या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळत असल्याचे दिसून आले. २२७ प्लास्टिक व मातीच्या मडक्यात १०० किलो सडवा मोहामाच, ९०० लिटर हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी जितेंद्र रणभीड मेश्राम (वय ३७, रा.संगम पुनर्वसन) याला अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर, धर्मेंद्र बोरकर, सतीश देशमुख, राजू दोनोडे, प्रशांत कुरंजेकर, सचिन देशमुख यांनी केली.
बॉक्स
धाड टाकण्यासाठी पोलीस गेले वैनगंगा पोहून
भंडारा तालुक्यातील संगमबेटावर बुधवारी पोलिसांनी अवैध दारू कारखाना उद्ध्वस्त केला. मात्र, या बेटावर पोहोचणे पोलिसांसाठी मोठे दिव्य होते. निर्जन असे हे बेट चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. तेथे पोहोचण्यासाठी बोटीशिवाय किंवा पट्टीच्या पोहणाऱ्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांकडे कोणतीही बोट नव्हती. मात्र, पैलतिरावर एक बोट दिसताच पोलीस नायक सतीश देशमुख पोहून गेले आणि त्यांनी नाव आणून इतर पोलिसांना संगम बेटावर पोहोचविले. ही धाडसी कारवाई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी कौतुक केले.