भंडारा : राज्य शासनाने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे जुन्या नियमानुसारच ही प्रक्रिया राबविली जात आहे. १७ मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, तीन दिवसांत ८२९ अर्ज दाखल झाले आहेत.
९ फेब्रुवारी अधिसूचना जारी करून २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज १६ एप्रिलपासून मागविण्यात आले होते. एक विद्यार्थ्यांच्या घरापासून किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थसाहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहायित शाळेत मुलांना २५ टक्के प्रवेश देण्याचा हा निर्णय होता. यामुळे पालकांना त्यांच्या पाल्याचा अर्ज भरताना इंग्रजी माध्यम शाळेचा पर्याय मिळत नव्हता. परंतु, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक करण्यात आले. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. दरम्यान, नव्याने प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आरटीई प्रवेशासाठी तीनच दिवसांत ८२९ अर्ज ऑनलाइन आले. ३१ मेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याने किती अर्ज येतात याकडे लक्ष लागले आहे.'या' सुधारणांना स्थगितीबालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी वंचित, दुर्बल व सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांतील प्रवेशाच्या निकषात ९ फेब्रुवारी २०२४ रोजी अधिसूचना जारी करून बदल केला होता. त्यानुसार पात्र मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम उपलब्ध नव्हता. परंतु, या सुधारणेला न्यायालयाने स्थगिती दिली. ठेवला होता. यात इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध नव्हता. परंतु आता या सुधारणेला न्यायालयाने स्थगिती दिली.९१ शाळांत ७७२ मोफत प्रवेशन्यायालयाच्या स्थगितीनंतर नव्याने प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ९१ निकषपात्र शाळांमध्ये आरटीई २५ टक्के अंतर्गत ७७२ जागांवर पात्र विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.पोर्टलवरील सूचना पाळूनच अर्ज भरा१७ मेपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्यासाठी ३१ मेपर्यंत अवधी असून, आरटीई पोर्टलवरील सूचना पाळून अर्ज भरावा, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.
कोणत्या तालुक्यात किती शाळा व जागातालुका शाळा जागाभंडारा २३ २१९मोहाडी १६ ११८तुमसर १७ १५९साकोली १० ८७लाखनी ८ ७८लाखांदूर ५ २४पवनी १२ ८७एकूण ९१ ७७२