महेश वसंतराव डोंगरवार (३६, रा. शिवाजी वार्ड, साकोली) असे मृताचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री महेश भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. बेडरूममध्ये हे दोघे असताना प्रेयसीच्या पतीची एन्ट्री झाली. त्याने बेडरूमचे दार वाजविले. तेव्हा महेश हातात कपडे पकडून बाल्कनीत पोहोचला व बाल्कनीच्या दाराची कडी बाहेरून लावली. आतून दार वाजविण्याचा आवाज येत असल्याने तो गडबडीत खाली उरण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि थेट सिमेंट रस्त्यावर पडला. त्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विवाहितेने भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहे.
विवाहित प्रेयसीला भेटायला गेला अन् जीव गमावून बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:38 AM