५ जुलै २०२१ रोजी ट्विटर आंदोलन तसेच ६ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तथा सर्व मंत्र्यांना आपल्या मागणीबाबत ई-मेल आंदोलन करणार आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनामुळे याच कालावधीमध्ये संघटनेचे राज्य पदाधिकारी मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयावर धडक देणार आहेत. त्यामुळे सरकार दरबारी शासकीय, निमशासकीय तरुण कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. यापुढे हॅशटॅगचा वापर करून लाखो कर्मचारी ट्विटर आंदोलन करणार आहेत.
बॉक्स
मुख्यमंत्री साहेब जुनी पेन्शन लागू करा
राज्यातील सर्व तरुण कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वतःला झोकून देत कोरोना विरोधात लढाई दिली. आपले कर्तव्य निभावले. यादरम्यान अनेकांना आपले प्राणदेखील गमवावे लागले. अशा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला तसेच सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. यासोबतच केंद्राप्रमाणे इतर सुविधा दिल्या जाव्या अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सर्व राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांनी आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी लाखो कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी पूर्ण करावी, अशी यावेळी मागणी केली आहे.