लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाळ्याच्या सुटी कालावधीत शाळेचे कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत सुरु ठेवण्यात यावे. दिर्घकालीन सुटी असणाºया सर्व कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे अशा आशयाच्या पत्रामुळे मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने पत्र मिळताच दुसºयाच दिवशी शिक्षणाधिकाºयांना भेटून त्या पत्राचा विरोध दर्शविला.सध्या जिल्ह्यात ‘मे’ हीटचा कडाका सुरु आहे. सर्वत्र उष्ण तापमान असल्यामुळे उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. अशा विपरित परिस्थितीत शाळेचे कार्यालय सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत ठेवणे सोयीचे नाही. ग्रामीण भागात विजेचे भारनियमन सुरु आहे. माध्यमिक शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या असताना देखील शिक्षकांना सुट्यांमध्येही शाळांची कार्यालये सुरु ठेवावी लागतात. मुख्याध्यापक, लिपीक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना दीर्घकाळातील सुट्या अनुज्ञेय नसतात. शाळेतील दैनंदिन कामकाज, विद्यार्थी, पालकसभा या वर्षभर होतच असतात.सोशल मिडीयावरुन शिक्षण विभागाकडून वेळोवेळी माहिती मागीतली जाते.ती माहिती मुख्याध्यापकांकडून वेळेत सादर केली जाते. असे असताना मुख्याध्यापकांनी , शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी दिवसभर शाळेत राहावे असे(माध्य) शिक्षणाधिकारी यांनी पत्र काढल्यामुळे शिक्षकांमधून याचा विरोध दर्शवला जात आहे.शिक्षणाधिकाºयांनी २१ मे रोजी काही शाळांना भेटी दिल्या. या भेटीत शाळा बंद असल्याचे आढळून आल्याने पत्र काढण्यात आल्याचे सांगितले.भारनियमन विचारात घेता भंडारा जिल्ह्यातील सर्वच माध्यमिक विभागाच्या शाळा कार्यालयीन कामासाठी सकाळी अकरापर्यत सुरु ठेवली जातात. व त्यानंतर बंद केली जातात. शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांनी शाळांना भेटी दिल्या. काही शाळा त्यांना या वेळेत उघड्या सापडल्या होत्या. भेट दिल्यानंतर शाळा बंद दिसून आल्याने मुख्याध्यापकांसह ,शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी सायंकाळी ६ पर्यंत शाळेत उपस्थित राहण्याचे पत्र काढल्याने मुख्याध्यापकांनी या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे.संघटनेच्या पदाधिकाºयांची तात्काळ भेट घेत मुख्याध्यापकांनी एकत्र येत या पत्राचा विरोध दर्शवला होता. मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू बालपांडे, सचिव जी. एन. टिचकुले, संघटनेचे पदाधिकारी राजू बांते, अनमोल देशपांडे, गोपाल बुरडे, संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष अशोक पारधी, सुनील घोल्लर, आर. यू. शेंडे, वाय. एम. बेग, राजू भोयर, सुरेश गोमासे, एस. एस. शेंदरे, बी.पी. चांदेवार, जी. के. बीसने, सुनिता तोडकर, संजीव कुकडे, शालीक चेटूले, एस.पी. लांजेवार, एस. टी. मने, एस. एस. गहाणे, प्रदीप गेडाम, सुनील गांगरेड्डीवार, दामोधर काळे आदी मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी काटोलकर यांची भेट घेतली.२१ मे रोजी काढलेल्या पत्रावर मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी अशोक पारधी, राजु बालपांडे, जी. एन. टिचकुले, राजू बांते यांनी चर्चा केली.विद्यार्थी, पालकांंच्या समस्या सोडविण्यासाठी शाळांना भेटी करता याव्या याहेतूने शाळा दिवसभर सुरु ठेवण्यासाठी आपण पत्र काढल्याचे शिक्षणाधिकाºयांनी यावेळी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेनंतर २७ मे रोजी सुधारित पत्र काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाºयांनी संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे एक तारखेला वेतन व्हावे, शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्या, जुन्या ईमारतींचे बांधकाम करण्याबाबत समस्या यावेळी मांडण्यात आल्या.कार्यालयीन वेळ बदलण्याची मागणीशिक्षक उपसंचालकांनी २ मे रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक/ प्राथमिक, जि.प.शिक्षणाधिकारी महानगरपालिका नागपूर केवळ यांच्या पुरते उन्हाळा अधिक असल्याचे पत्र काढले. फक्त नागपूर शहरापुरतेच शाळेतील कार्यालयीन कामकाज सकाळच्या वेळेत १० वाजतापर्यंत सुरु ठेवण्याचे सुचविले आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील शिक्षकांनी भंडारा जिल्ह्यातही तापमान ४५ अंश सेल्सीयश पर्यंत असल्याने जिल्ह्यातील शाळेची कार्यालयीन वेळ सकाळी १०:०० वाजेपर्यत असावी अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राने मुख्याध्यापक, कर्मचारी संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:59 AM
उन्हाळ्याच्या सुटी कालावधीत शाळेचे कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत सुरु ठेवण्यात यावे. दिर्घकालीन सुटी असणाºया सर्व कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे अशा आशयाच्या पत्रामुळे मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देउन्हाळी सुटीत शाळेत राहण्याची सक्ती : चर्चेअंती सुधारीत पत्र काढण्याचे आश्वासन