भंडारा : मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर पतंजली योग समिती मिस्किन टँक शाखा भंडारातर्फे श्री साई मंदिर (कारधा रोड) येथे योग साधकांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. साई मंदिराच्या प्रांगणात आयोजित या शिबिराला योग साधकांचे ब्लड प्रेशर, मधुमेह, ऑक्सिजनची मात्रा, वजन याची तपासणी करून आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित असलेल्या चमूतील विशाल नेवारे, नंदा पारधी, मोहुर्ले यांनी उपस्थितांची तपासणी करून घेतली. नॅचरोपॅथीस्ट सुलभा मेश्राम यांनी विविध आजाराबाबत मार्गदर्शन केले. यशवंत गायधनी यांनी मकरसंक्रांती सणाचे महत्त्व सांगितले. संचालन योग साधक श्याम कुकडे यांनी केले. याप्रसंगी योग समितीचे प्रमुख तथा योगशिक्षक श्याम कुकडे, यशवंत गायधने, सदानंद इलमे, हरिभाऊ थोटे, धनराज जंजाळ, चिंटू बोधे, महादेवराव बांगळकर, बाबूराव डोये, प्रभाकर तीतिर्मारे, पुरुषोत्तम साकुरे, राखडे महाराज, मधुकर गभणे, संतोष लांजेवार, शिवराम बारई, रमेश कटकवार, श्याम सार्वे, खुशाल साठवणे, आनंद बाभरे, अशोक साकुरे, मोहतुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख्याने राज्य शासनाने कोविड १९ अंतर्गत नेमून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.
साई मंदिर येथे योग साधकांकरिता आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:39 AM