त्यामध्ये डॉ. प्रकाश देशकर, डॉ. राजकुमार मुंडले, डॉ. विवेक ढोमणे, प्रीती रयपूरकर, संदीप शेंडे, किशोर पडोळे या सर्व स्पेशालिस्टकडून ६८९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, दंत, नेत्र, रक्त गट तपासणी मोफत करण्यात आले. चष्मा केवळ २०० रुपयांमध्ये देण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ गावातील नागरिकांनी उत्साहात घेतले. कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये रात्रीचे दिवस करणारे गावातील डॉक्टर, नर्स व आशा वर्कर यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई होते. उद्घाटक डॉ. प्रकाश देशकर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकर तेलमसारे, माजी सभापती बंडू ढेंगरे, जिल्हा कॉंग्रेसचे सहसचिव अशोक पारधी, हंसराज गजभिये, सावरलाचे उपसरपंच उत्तम सावरबांधे, विनोद जिभकाटे, तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिकेत गभणे, शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पारधी व ग्रामवासी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता महेश नान्हे, विपुल शेंडे, विकी थेरे, अंकुश काटेखाये, पंकज वंजारी, रोहित खोब्रागडे, वैभव भाजीपाले, प्रफुल भाजीपाले, सचिन भाजीपाले, अनिकेत कुर्झेकर व इतर एनएसयूआय कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन ज्ञानेश्वर कुर्झेकर यांनी केले.
050721\img-20210704-wa0036.jpg
कोरोना योद्यांचा सत्कार करतांना जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, डॉ प्रकाश देशकर व अन्य पदाधिकारी.