शॉर्ट सर्किटमुळे कामकाज प्रभावित : कर्मचारी कामाविना कार्यालयाबाहेरप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील मिटरमध्ये गुरुवारला शॉर्ट सर्किट झाले. यामुळे मागील पाच दिवसांपासून या विभागाची ‘बत्तीगुल’ झाल्याने अंधारात आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथील कामकाज प्रभावित झाले आहे. विद्युत नसल्याने कर्मचारी कार्यालयाऐवजी बाहेर भटकतांना दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणेत आरोग्य हा सर्वात मोठा घटक मानला जातो. आरोग्य विभागात अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाते. जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत अगदी विशेष समिती सभापतींच्या कक्षासमोर आरोग्य विभागाचा कक्ष आहे. या आरोग्य विभागात साथरोग, एनएचआरएम, संगणक कक्ष हे आरोग्य विभागाचे महत्वाचे विभाग आहेत. यांचे स्वतंत्र कक्ष या इमारतीत आहेत. या विभागाला विद्युत पुरवठा होणाऱ्या मिटर व अन्य तांत्रिक सामुहिक जिण्यालगत उभारण्यात आली आहे. गुरुवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास या मिटरमध्ये उच्चदाब निर्माण झाल्याने अचानक शॉर्ट सर्किट झाले. यामुळे येथून पुरवठा होणाऱ्या विद्युत जोडणी खंड पडला व क्षणाधार्थ आरोग्य विभाग ‘पंगू’ झाल्यागत येथील कर्मचाऱ्यांनी काळोख अनुभवला. शॉर्ट सर्किटच्या आवाजामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. मात्र, मोठी दुर्घटना टळली. गुरुवारला बंद झालेला विद्युत पुरवठा आज सोमवारला पाचवा दिवस झाल्यानंतरही पुर्ववत सुरु झालेला नाही. या विभागाचे कामकाज संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून राज्यस्तरावर अपडेट करण्यात येते. मात्र वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील कर्मचाऱ्यांना आता काम उरलेले नाही. त्यामुळे येथील कर्मचारी कार्यालयात कमी व कार्यालयाबाहेर भटकंती करताना अधिक दिसून येत आहे. देखभाल दुरुस्ती बांधकाम विभागाकडेजिल्हा परिषद इमारतीत प्रशासकीय कार्यालय भाडे तत्वावर आहेत. त्यांच्याकडून देखभाल दुरुस्तीच्या नावावर महिन्याला भाडे आकारण्यात येते. त्यामुळे आरोग्य विभागात शॉर्ट सर्किटमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने तो पुर्ववत करण्याची जबाबदारी जि.प. बांधकाम विभागाची आहे. गुरुवारला वीज खंडीत झाला असतानाही या विभागाने याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत नाही.५० हजार रुपयांचा खर्च शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या तांत्रिक बिघाडाला दुरुस्ती करण्याकरिता सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. याकरिता आरोग्य विभागाने बांधकाम विभागाला तातडीने पत्रव्यवहार केला. अत्याआवश्यक सुविधा पुरविणाऱ्या आरोग्य विभागाची वीज खंडीत झाल्याने त्यांना ती तातडीने उपलब्ध करुन देणे बांधकाम विभागाचे कर्तव्य आहे. मात्र, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे. त्या परवानगीकरिता आणखी किती दिवस जाईल याचा नेम नसल्याने आरोग्य विभागाचे कामकाज पुर्णपणे खोळबंले आहे.वीज पुरवठ्यासाठी ‘जुगाड’ विशेष समिती सभापतींच्या कक्षासमोर असलेल्या आरोग्य विभागाची बत्तीगुल झाले आहे. त्यामुळे असह्य उकाळ्यामुळे येथील कर्मचारी त्रस्त झाले आहे या कर्मचाऱ्यांनी बांधकाम विभागाचे सभापती व समाजकल्याण सभापती यांच्या कक्षातुन वीज जोडणीचा तात्पूरता ‘जुगाड’ केला आहे. यावर या कक्षातील समोरील व मागील असे दोन कुलर सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे.
पाच दिवसांपासून आरोग्य विभागाची ‘बत्तीगुल’
By admin | Published: May 30, 2017 12:24 AM