बॉक्स
चॉकलेट्स न खाल्लेलेच बरे !
चॉकलेटचा हट्ट न पुरविलेलाच बरा
चॉकलेट आवडत नाहीत असा एखादा मुलगा शोधूनही सापडणार नाही. मात्र असे असले तरीही लहान मुलांना अति प्रमाणात चॉकलेट खायला देणे दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. चॉकलेट्स हे दातांना आणि हिरड्यांना चिकटून राहत असल्याने यामुळेच दात कीडतात. दाडा दुखायला लहानपणीच सुरुवात होते.
बॉक्स
अशी घ्या दातांची काळजी ...
लहान मुले सकाळी ब्रश करण्याचा कंटाळा करतात. अशावेळी पालकांनी मुलांचे दात घासणे आवश्यक आहे. यासोबतच लहान मुलांना जेवणानंतर चूळ भरण्याची सवय लहानपणीच लावावी. चॉकलेट्स, गोडपदार्थ कमीत कमी प्रमाणात खायला द्यावे, जेणेकरुन दातदुखीसारखे आजार आपण टाळू शकतो.
बॉक्स
लहानपणीच दातांना कीड ...
चॉकलेट्स आणि चिकट खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने लहानपणीच मुलांचे दात किडायला सुरवात होते. यासोबतच अनेक प्रकारची क्रीम बिस्किटे खाण्याचेही प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. याच कारणाने मुलांचे दात कीडतात.