लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चातकासारखी पावसाची वाट पाहत असलेला बळीराजा रविवारी सुखावला. दुपारी ३ वाजतानंतर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह लाखनी, पालांदूर, साकोली, वरठी, मोहाडी, तुमसर, नाकाडोंगरी, पवनारा, आसगाव, पवनी व लाखांदूरातही पाऊस बरसला. मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून रोवणीच्या कामाला धडाक्यात प्रारंभ होणार आहे.गत पंधरवाड्यापासून बळीराजा पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत होता. काही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली असतानाही पावसाचा थांगपत्ता नव्हता. काही ठिकाणी पाण्याअभावी पऱ्हे करपत असल्याचीही बाब उजेडात आली होती. दरम्यान रविवारी बरसलेल्या पावसाने या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले आहे. मशागतीनंतर पाऊस आवश्यक असून आता चिखलणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. याचवेळी पऱ्ह्यांचे गठ्ठे बांधून रोवणीच्या कामालाही प्रारंभ होणार आहे.वरठी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार गावातील सखल भागात पाणी शिरल्याने अनेक घरामध्ये पाणी साचले होते. घरातील साहित्यही ओले झाले. परंतु रविवारी आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.तुमसर तालुक्यात मेघ गर्जनेसह दमदार पाऊस बरसला. वातावरणात गारवा निर्माण झाला असून पºह्यांना जीवनदान मिळाले आहे. जवळपास एक तास पावसाने हजेरी लावली. सखल भागात पाणी साचले होते. पुन्हा एकदा दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.बळीराजा सुखावलारविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पेरणीनंतर पावसाअभावी पऱ्हे करपत होती. आजच्या पावसाने करपलेल्या पºह्यांना जीवनदान मिळाले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजा सुखावला गेला. करडी परिसरात खरीप हंगामांतर्गत पाच हजार ४६४ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाची पेरणी पुर्ण झाली असून तूर व तिळ पिकाची लागवडही बांध्यावर करण्यात आली आहे. दरम्यान गत आठवड्याभरात पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला होता. परंतु पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवण्या रखडल्या होत्या. कोरडवाहू शेतीचे पऱ्हे रोवणी योग्य झाले असल्याने आजच्या पावसाचा या पºह्यांना फायदा झाला असून नवसंजीवनी मिळाली आहे.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:00 AM
मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून रोवणीच्या कामाला धडाक्यात प्रारंभ होणार आहे. गत पंधरवाड्यापासून बळीराजा पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत होता. काही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली असतानाही पावसाचा थांगपत्ता नव्हता. काही ठिकाणी पाण्याअभावी पऱ्हे करपत असल्याचीही बाब उजेडात आली होती. दरम्यान रविवारी बरसलेल्या पावसाने या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले आहे.
ठळक मुद्देरोवणीच्या कामाला सुरुवात : धान खरेदी केंद्रावरील पोती ओली