पवनी (भंडारा) : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होत असल्याने पाणी नियंत्रणासाठी सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रकल्पाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. ३००२.३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सद्यस्थितीत प्रकल्पाची पाणीपातळी २४२.२९० मीटर आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी प्रकल्पाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. त्यातून ३००२.३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत केला जात आहे.
विदर्भात आभाळ फाटले; अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती
प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रातून अवागमन करणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.