गत पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली हाेती. पऱ्हे राेवणीचे काम खाेळंबले हाेते. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या हाेत्या. अशातच गुरुवारी सकाळी प्रचंड उकाड्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास जाेरदार पावसाला सुरुवात झाली. लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात जाेरदार पाऊस काेसळला यासाेबतच पवनी तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. काेंढा परिसरात शेतकरी या पावसाने सुखावला आहे.
माेहाडी तालुक्यातील आंधळगाव जवळील नेरला शिवारात गुरुवारी दुपारी वीज काेसळली. त्यात नन्ने खान पठाण यांच्या तीन शेळ्या ठार झाल्या. यात त्यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. तलाठ्याने पंचनामा केला आहे. जिल्ह्यात सध्या राेवणीची कामे वेगात सुरू असून या पावसामुळे शेती कामांना आता वेग येणार आहे. गत पाच दिवसांपासून वाढलेला उकाडाही कमी हाेऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.