लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्याचे दिवस असूनही उष्णतेत वाढ होत असल्याने पुन्हा शासकीय निमशासकीय कार्यालयात तर, काही घराघरामध्ये पंखे, कुलरची घरघर सुरू झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे महागडे बि-बियाण्याची शेतात पेरणी केली. जमिनीबाहेर बिजाअंकुर आले. परंतू पाण्याअभावी हिरवेगार वाऱ्यावर डुलणारे बिजाअंकुर आता करपण्याच्या मार्गावर दिसत आहेत.यावर्षी पाऊस लांबणीवर पडला त्यामुळे खरीप हंगामातील धान पऱ्हे तसेच तूर, कापूस, सोयाबिन, मका व इतर पिकाची पेरणीही शेतकऱ्यांनी उशिरा सुरू केली. रोहणी, मृग, व अर्धाअधिक आद्रा नक्षत्र कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. दमदार पावसाने कोरड पडलेल्या नद्या नाल्यांना ओले करून त्यात पाण्याची धार आली. परंतू पुन्हा पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पिक हिरवेगार दिसत असतांना पुन्हा आकाशात ढगाळ वातावरण निवळले गेले. त्यामुळे सुर्याचे दर्शन होवून पुन्हा वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे.वातावरण बदलाचा परिणाम आजारावर सुध्दा पडत आहे. त्यामुळेच मानवासोबत पशुप्राणी यांनाही आजाराचा सामना करावा लागत आहे. वातावरणात बदल होत असल्याने त्याचा थेट खरीप हंगामाच्या पिकावरही परिणाम पडत आहे. पाऊस उशिरा व तेही अल्प पडल्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने खरीप हंगामाची पेरणी तर उरकुन घेतली, पण पाऊस असाच दगा देत राहील तर खरीप हंगामाचे काही खरे नाही. .शेतात पिक निघाले की त्याला भावही मिळत नसते. शेतकºयांना पिकाच्या उत्पादन खचार्साठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. त्याचे व्याज वाढू नये यासाठी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करावा लागतो. अव्वाच्या सव्वा व्याज आकारून सावकार शेतकऱ्यांची पिळवणुक करतो. त्यामुळेच पिक निघाल्यावरही इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली असते.आता मागील तीन वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबून बेजार झाला आहे. यावर्षी काहीतरी हातात पडेल अशी आशा असतांना आता त्या बिजा अंकुराला निसर्गाच्या पावसाची गरज आहे. त्यामुळेच पुन्हा केव्हा पाऊस येईल, यासाठी शेतकºयांची नजर आकाशाकडे लागली आहे.शेती व्यवसाय धोक्याचानिसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाच्या उत्पादनात सातत्याने घट येत आहे. आता रासायनिक खताचे भावही गगनाला गेले आहे. शेतमजूर मिळेनासे झाले आहेत. शेतात काम करणे कठीण झाले आहे. शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाला आहे. आतापासून दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी शेतकरी हा विविध कारणांमुळे दुखावला जात आहे.
पावसाच्या दडीने उकाडा वाढला पुन्हा सुरू झाली कुलरची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:59 AM
पावसाळ्याचे दिवस असूनही उष्णतेत वाढ होत असल्याने पुन्हा शासकीय निमशासकीय कार्यालयात तर, काही घराघरामध्ये पंखे, कुलरची घरघर सुरू झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे महागडे बि-बियाण्याची शेतात पेरणी केली.
ठळक मुद्देदुबार पेरणीची गडद छाया। जमिनीबाहेर निघालेले अंकुर पाण्याअभावी करपले