लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १ डिसेंबरपासून भंडारा जिल्ह्यात हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या सक्तीमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. परिणामी हेल्मेटची सक्ती राज्य व राष्ट्रीय महामार्गावर करावी परंतु शहरात करु नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात आल्यानंतर शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. लहान सहान कामांसाठीही हेल्मेटचा वापर करावा लागत आहे. ५० किंवा १०० मीटर अंतरावर जावे लागत असल्यास हेल्मेट घालून जावे लागते.शहरातील अंतर्गत मार्गावर विशेषत: बाजार परिसरात हेल्मेटमुळे अडथळा निर्माण होत असल्याची बाब नागरिक बोलून दाखवित आहेत. शहरातील मोठा बाजार, छोटा बाजार, बसस्थानक परिसर, खाजगी दवाखाना, सामान्य जिल्हा रुग्णालय, बँकेची कामे, दुग्ध डेअरी यासह आवश्यक बाब असलेल्या साहित्यांसाठी बाजारपेठेत जावे लागते. अशावेळी समस्या उद्भवत असल्याचे समोर येत आहे. खाजगी कामे रखडले असून हेल्मेटची सक्ती करुन उपयोग काय? असा सवालही उपस्थित होत आहे.हेल्मेट सक्तीला विरोध नाही पंरतु त्याची अंमलबजावणी शहराबाहेर जाताना आवश्यक आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. परिणामी सामान्य नागरिकांच्या व व्यापा-यांच्या समस्या लक्षात घेता हेल्मेटची सक्ती भंडारा शहरात न करता राज्य व राष्ट्रीय महामार्गावर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यासह अन्य अधिका-यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर, डिम्पल मल्होत्रा, गजेंद्र हरकंडे, सुनील साखरकर, मंगेश वंजारी, विनोद भुरे, जुनेद खान, राजू देसाई, अतुल मानकर, हरि उमप आदीं उपस्थित होते.पेट्रोलिंग कशासाठी?जिल्ह्यातील राज्यमार्गावर पोलीस दलातर्फे हेल्मेट सक्तीबाबत पेट्रोलिंग केली जात आहे. यात हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई होत नसल्याचेही बाब समोर आली आहे.परिणामी पेट्रोलिंग कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.
हेल्मेटची सक्ती शहरात नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 9:48 PM
१ डिसेंबरपासून भंडारा जिल्ह्यात हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या सक्तीमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. परिणामी हेल्मेटची सक्ती राज्य व राष्ट्रीय महामार्गावर करावी परंतु शहरात करु नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दैनंदिन कामावर होतोय परिणाम