लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून जखमींना मदत करण्याचे अनेक जण टाळतात. महत्त्वाच्या वेळीच मदत न मिळाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. मात्र आता रस्ते अपघातातील जखमींना बिनधास्त मदत करा, पोलीस कुठलाही त्रास देणार नाही, अशी ग्वाही खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिली आहे.अनेकदा रस्त्यावर अपघात होतो. जखमी त्या ठिकाणी मदतीच्या प्रतीक्षेत असतात. परंतु कुणीही त्यांच्या मदतीला धावून जात नाही. या मागचे मुख्य कारण म्हणजे पोलीस चौकशीचा ससेमिरा होय. अशा प्रकरणात अनेक जखमींना अपघातस्थळीच प्राण सोडवा लागला. अपघातातील जखमींना पहिल्या एक तासात मदत झाली तर प्राण वाचू शकतो. त्यासाठी आता पोलिसांना विशेष निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना दिली होती. या सूचनांची अंमलबजावणी भंडारा जिल्ह्यात काटेकोरपणे केली जात आहे. पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनांची काटेकोरणपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही याबाबत आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता या आदेशामुळे अपघातातील जखमींना मदत करण्यास सर्वसामान्या पुढे येतील.माहिती देणाऱ्यांची ओळख ठेवणार गुप्तमोटारवाहन अपघातातील जखमीस रुग्णालयात उपचारासाठी नेणाºया अथवा अपघाताची माहिती देणाºयाची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे. त्याला कोणताही उलट प्रश्न केला जाणार नाही. अपघाताची माहिती त्रयस्थ व्यक्तीने, नागरिकांनी फोनवरून अथवा प्रत्यक्ष दिल्यास ओळख गुप्त ठेवली जाईल. याबाबत पोलिसांकडून दबाव आणला जाणार नाही, असेही निर्देश देण्यात आले.त्रास दिल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईअपघाताची माहिती देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस किंवा साक्षीदारास शासकीय कर्मचाऱ्याने त्रास दिल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, तसेच विभागीय चौकशी करण्यात येईल. उलट जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांचा जिल्हा प्रशासनाकडून यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.मोटार अपघातातील प्रत्यक्ष साक्षीदाराने मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता जखमींना योग्य ती मदत करावी. पोलिसांना दूरध्वनी क्रमांक १०० वर तात्काळ माहिती देऊन तात्काळ सहकार्य करावे.-विनिता साहू, पोलीस अधीक्षक, भंडारा.
अपघातातील जखमींना बिनधास्त मदत करा, पोलीस त्रास देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 9:34 PM
रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून जखमींना मदत करण्याचे अनेक जण टाळतात. महत्त्वाच्या वेळीच मदत न मिळाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. मात्र आता रस्ते अपघातातील जखमींना बिनधास्त मदत करा, पोलीस कुठलाही त्रास देणार नाही, अशी ग्वाही खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिली आहे.
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : अंमलबजावणीचे ठाणेदारांना आदेश