शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

महामार्गावर आंदोलन करण्यास येणार बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 10:27 PM

जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : पोलीस अधीक्षक, आरटीओ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मागविला अभिप्राय

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात आहे. मात्र यामुळे या मार्गावरून जाणाºया सर्व सामान्य प्रवाशांसह रुग्ण आणि विद्यार्थ्यांना या काळात प्रचंड हाल सोसावे लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी आणि कायमचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर होणाºया आंदोलनास बंदी घालण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुख्याधिकारी आणि नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अभिप्राय मागविला आहे. लवकरच जिल्हा प्रशासन महामार्गावर आंदोलनासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्याच्या तयारीत आहे.भंडारा शहरातून कोलकाता-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. शहराला बायपास नसल्याने संपूर्ण वाहतूक याच माहामार्गावरून होते. रायपूर ते नागपूर हा अतिशय व्यस्त असा महामार्ग आहे. अहोरात्र वाहतूक सुरू असते. त्यात अवजड वाहनांसह स्कूल बसेस, रुग्ण वाहिका आदी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. परंतु आंदोलनात या राष्ट्रीय महामार्गालाच लक्ष केले जाते. मागणी कोणतीही असली तरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्याकडेच आंदोलकांचा कल असतो. गत काही वर्षात चक्का जाम, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन असे विविध आंदोलने राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील विविध गावात आंदोलने केली जात आहे. गत महिनाभरापासून तर धान पिकाच्या पाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे या मार्गावरून जाणाºया वाहन धारकांना मोठा त्रास होतो. चक्का जाम सुरू झाला की, अवघ्या काही वेळातच वाहनांची दुतर्फा मोठी रांग लागते. विशेष म्हणजे भंडारा शहरात आंदोलन असेल तर त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही होतो. शहरातच अवजड वाहने उभे राहत असल्याने शहरवासीयांना रस्ता पार करणे कठीण जाते. वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पोलिसांची मोठी दमछाक होते. अनेकदा रस्ता रोको आंदोलनाचा फटका रुग्णांना बसतो. वाहनांची कोंडी झाल्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता काढत रुग्णालयापर्यंत पोहचणे कठीन जाते. भंडारा शहरालगत अनेक शाळा राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथे जाणाºया स्कूल बसही अडकून पडतात. बाहेरगावावरील वाहनधारक ताटकळत असतात. शहराच्या ठिकाणी आंदोलन झाले तर खाण्याची सोय होवू शकते. परंतु ग्रामीण भागात आंदोलन झाल्यास उपाशी रहावे लागते. वाहनांमधील महिला प्रवाशांना प्रसाधनाची मोठी समस्या येते. हा सर्व प्रकार वर्षातून अनेकदा अनुभवावा लागतो.आता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास मज्जाव करणारा कायमस्वरूपी मनाई वटहूकुम निर्गमित करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने भंडाराच्या जिल्हा पोलीस अधिक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अभिप्राय मागविला आहे. ५ आॅक्टोबर रोजी निर्गमित या पत्रात तातडीने अभिप्राय जिल्हा प्रशासनाला पाठवावे, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांनी म्हटले आहे.सर्व सामान्य प्रवाशांना त्रास होवू नये याकरिता राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास प्रतिबंध घालण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. लवकरच हा मनाई आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे.-विजय भाकरे, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भंडारा.