संभा शंकर हृदय (२५, रा. मेंढेगाव) असे मृताचे नाव आहे. त्याला मद्य प्राशनाची सवय होती. दारू पिवून नेहमी पत्नीला मारहाण करीत होता. या सततच्या त्रासामुळे संभाचे वडील शंकर तुकाराम हृदय हे आपल्या सूनेला सहा दिवसांपूर्वी तिच्या माहेरी सोडून आले. तेव्हापासून संभा अधिकच मद्य प्राशन करू लागला. जेवणही करीत नव्हता. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. वडिलांनी त्याला भुयार येथील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. मंगळवारी सकाळी संभाला औषधी घेण्याचे सांगून शंकर आणि त्याची पत्नी शेतावर कामासाठी गेले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरी परत आले. घराच्या मागच्या खोलीत लाकडी मयालीला साडी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत संभा आढळून आला. या घटनेची माहिती पवनी पाेलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास पोलीस नायक बिसने करीत आहेत.
पत्नी माहेरी गेली अन् पतीने गळफास घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST