शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
5
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
10
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
15
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
16
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
17
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
18
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
19
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
20
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

ऐतिहासिक तुमसर शहर ‘हायटेक’ करणार

By admin | Published: March 20, 2016 12:39 AM

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तुमसर शहरातचा सर्वांगिण विकास करण्याचा ध्यास नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

नगराध्यक्ष कारेमोरे यांचा संकल्प पथकाने केली विकासाची पाहणी, राजकीय हेवेदावे सारले बाजूलातुमसर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तुमसर शहरातचा सर्वांगिण विकास करण्याचा ध्यास नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. हिरवे तुमसर, सुंदर तुमसर असे घोषवाक्य देवून नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्प केला आहे. नगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या संकल्पाला येथील नागरिकांनीही उत्तम साथ देण्याचा विळा उचलला आहे. दरम्यान नगरपरिषद सभागृहात आयोजित सभेत नगराध्यक्षांनी कर्मभूमीचा विकास हाच आपला ध्यास असून तंत्रज्ञानाच्या युगात नगरपरिषद हायटेक करण्याचा मानस व्यक्त केला. विकास कार्यात राजकीय द्वेशभावना व राजकारण न करता केवळ विकास कार्य करणे हाच संकल्प आपण केला. नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे पुढे म्हणाले, तुमसर नगरपरिषदेची स्थापना १८६७ मध्ये झाली होती. सध्या तुमसर शहराची लोकसंख्या ४४ हजार ८३६ इतकी आहे. शहरात ११ हजार घरे आहेत. खुल्या जागेवर शौच करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. नगरपरिषदेकडून कोणतेही प्रमाणपत्र प्राप्त करावयाचे असल्यास त्याला शौचालयाचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुमसर शहराची भौगोलिक रचना पूर्वजांनी दूरदृष्टी ठेवून केली होती. सध्या मात्र शहराला अतिक्रमणाचा विळखा घातला गेला आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी येथे अतिक्रमण काढण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. पालिकेने घेतलेल्या या पुढाकाराला सर्वच स्तरातून सहकार्य मिळत आहे. या सभेला नगरपरिषद गटनेता प्रमोद तितीरमारे, श्याम धुर्वे, नगरसेवक आशिष कुकडे यांनीही संबोधित केले. कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांनी प्रास्ताविक केले. आभार नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे यांनी मानले. तत्पश्चात जिल्हा माहिती अधिकारी मनिषा साबळे व पथकाने तुमसरातील सुसज्जीत विवेकानंद वाचनालय, गांधीसागर उद्यान, न.प. कनिष्ठ महाविद्यालय, गांधी प्राथमिक शाळा, जलशुद्धीकरण केंद्र, नवनिर्मित शौचालय बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी नगरपरिषद उपाध्यक्ष सरोजताई भुरे, नगरसेवक सलाम तुरक, अ‍ॅड. विवेक स्वामी, कविता साखरवाडे, विजया चोपकर, मीना गाढवे, भाग्यश्री निखाडे, चंदा धार्मिक, शालिनीताई पेठे, सविता ठाकूर, किशोर भवसागर, लालू हिसारिया, शोभा लांजेवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी )प्रमुख चौकात लागणार सीसीटीव्हीतुमसर शहरात प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. दलित वस्ती योजनेत २५ कोटींची विकास कामे करण्यात आली. १०३ सिमेंट रस्ते १०७ नाल्या बांधकाम मटन व मासोळी बाजाराचे नूतनीकरण करण्यात आले. पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईट, नगरपरिषदेचे कामकाज ई-गर्वनन्स करण्यात आले.