शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

अतिवृष्टीचा फटका; पितृपक्षात भाजीपाल्याचे दर झाले दुप्पट, कोथींबीरही महागले

By युवराज गोमास | Published: October 02, 2023 4:38 PM

मागणीत वाढ तर बाजारात आवक घटल्याचा परिणाम

भंडारा : गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरूवात झाली. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. परंतु, यंदा अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे नुकसान होवून बाजारात आवक घटली आहे. याचदरम्यान मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टीने वाढले आहेत. भाज्यांचे स्वाद वाढविणारा कोथींबीरही महागला आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्वी भाजीपाल्याचे दर कमालीने पडले होते. वांगे, टमाटर, भेंडी आदींना १० ते २० रूपये प्रति किलोचा दर मिळता होता. परंतु, गणेशोत्सव सुरू होताच भाजीपाला कडाडला. भाजीपाल्याचे दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. पितृपक्षात भाववाढीचा आलेख चढतच आहे. नागरिकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी लागत आहे. एकीकडे भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे; तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने भाज्यांच्या किंमती वाढल्याचे चित्र आहे.

पितृपक्षात भेंडी, दोडके, चवळी शेंग आणि लाल भोपळ्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे ४० रुपये प्रति किलो असलेली चवळी शेंग आता ८० ते १०० रूपयांवर गेली आहे. दोडके ८० रूपये, वांगे ६० रूपयांवर पोहचले आहे. टमाटर मात्र स्थीर आहे. भाज्या महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसतो आहे. आणखी महिनाभर भाववाढ राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.भाजीपाला दर प्रतिकिलो

वांगे ५० ते ६०टमाटर १५ ते २०चवळी ८० ते १००शिमला ६० ते ८०दोडके ७० ते ८०फुलकोबी ४० ते ६०पत्ताकोबी ३० ते ४०हिरवी मिरची ६० ते ८०टोंडरी ४० ते ६०लालभाजी २० रूपये जुडीकारले ६० ते ८०मेथी ८० ते १००कोथींबीर १८० ते २००भेंडी ३० ते ४०

पालेभाज्या महागल्या

पालेभाज्यांची आवक घटली असून कोथिंबीर आणि मेथीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे बाजारात ४० ते ६० टक्के पालेभाज्यांची आवक घटली आहे. कोथिंबीरच्या दर वधारले असून मेथीची भाजी पावाने विकली जात आहे.'नैवद्यात' या भाज्यांचा समावेश

श्राद्धाच्या नैवद्यात भाज्यांमध्ये कोहळा, भेंडी, चवळी, दोडके, गिलके, कारले, काकडी आदी भाज्यांचा समावेश असतो. श्राद्धाच्या दिवशी या सर्व भाज्यांची मिश्र भाजी करण्यासह भजी. वडा, खीर, कडी, वरणभात, पोळी, अळूच्या पानाची वडी आदी पदार्थ केले जातात. तर्पण व पिंडदान करण्यात येऊन त्यानंतर कावळ्याला घास भरविला जातो.

टॅग्स :localलोकलbhandara-acभंडारा