पेट्रोल आणि डिझेलच्या कर कपातीची मागणी
भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरच्या अबकारी कर सवलतीची अपेक्षा पूर्ण फोल ठरली आहे. त्यामुळे पेट्रोल– डिझेलवरच्या अबकारी करत मोठी कपात करावी अशी मागणी करत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भंडाऱ्यात मंगळवारी धक्का मारो आंदोलन केले. मागच्या वर्षाच्या सुरूवातीला पेट्रोलचे भाव ७८ रुपयांच्या जवळपास होते. कोरोना काळात सर्वच व्यवहार थांबले होते. लॉकडाऊनमुळे वाहतूक पूर्ण बंद होती. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ओईलला घेण्यालाच नव्हते, त्यामुळे क्रूड ओईलचे भाव अगदी खालच्या स्तरावर पोहचले आहेत. तरीही मोदी सरकार कडून महामारीच्या काळात पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर मोठ्या प्रमाणात वाढवून जनतेला लुटण्याचे कार्य हे सरकार करीत आहे. त्या
वाढीव कराची झळ आता सामान्य माणसास झळ बसत आहे. पेट्रोल- डिझेलमध्ये झालेल्या या भाववाढीमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना आता करावा लागत आहे. ‘जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या, २००८ जुलै मध्ये प्रति
बरल १४२ डॉलर तर २०१२ फेब्रुवारीमध्ये प्रति बरल १२५ डॉलर होत्या. त्या आता केवळ ५५ डॉलरवर आहेत. याचा फायदा जनतेला थेट स्वरुपात दिला असता तर अर्थ व्यवस्थेला थोडी उभारी मिळू शकली असती. सामान्य जनतेच्या खिशाला आधार देण्याऐवजी महागाईचा फटका जनतेला आणि आर्थिक सवलती अंबानी-अदानी सारख्या काही मोठ्या उद्योजक मित्रांना असे मोदी सरकारचे उफराटे धोरण आहे.' असे या वेळेस जितेंद्र मदारकर यांनी सांगितले. संघटन मंत्री जितेंद्र मदारकर, सचिव आकाश बावणे, युवा संयोजक विक्की बागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात आम आदमी पार्टीचे संयोजक स्वप्नील भोंगाडे, तालुका सहसंयोजक राहुल उके, भंडारा तालुकाध्यक्ष हेमंत जांभूळकर, अभिजित श्यामकुवर, नाणेश्वर हुमणे , केशव बांते, चंचल सावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.