शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

उमेदवारीचा पोळा आज फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 5:00 AM

नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी सोमवार ६ डिसेंबर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ८२, तर पंचायत समित्यांसाठी १११ नामांकन दाखल झाले. मात्र, यात कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवाराचा समावेश नाही. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख चार पक्षांचे उमेदवार रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्यात होते. आता सर्वच पक्ष सोमवारी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोणत्याही पक्षाने रविवारपर्यंत आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नव्हती. आता सोमवार हा नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारीचा पोळा फुटणार आहे. कुणाला तिकीट मिळणार आणि कोण बंडखोरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर काही पक्षांत अद्यापही उमेदवारीचा घोळ सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी सोमवार ६ डिसेंबर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ८२, तर पंचायत समित्यांसाठी १११ नामांकन दाखल झाले. मात्र, यात कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवाराचा समावेश नाही. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख चार पक्षांचे उमेदवार रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्यात होते. आता सर्वच पक्ष सोमवारी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी तिकीट मिळालेल्या उमेदवारांची तारांबळ उडेल, तर इच्छुक असलेल्यांना तिकीट नाकारल्यास त्यांची बंडखोरीची तयारी राहणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याचे ठरविल्याचे दिसत आहे. मात्र, सर्वच पक्षांत उमेदवारीवरून ओढाताण सुरू असल्याचे दिसत आहे. बाहेरून पक्षात आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले जात असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे निष्ठावंत नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्यात महाविकास आघाडी असली तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडी होण्याची सध्यातरी कोणतीही शक्यता दिसत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता नवाब मलिक यांनी शनिवारी भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन आमच्याकडे काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले. शिवसेना मात्र संपर्कात आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार काय, यावरही रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, सध्यातरी सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत दिसत आहेत.नामांकनासाठी होणार मोठी गर्दी- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवार आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी घोषित झाली नाही. त्यामुळे सोमवारी सर्वांचीच तहसील कार्यालयात नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वेळेत उमेदवारी दाखल करण्यासाठी सर्वांचीच धडपड राहणार असून, प्रशासनावरही ताण येणार आहे. 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद