शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

आमदारांच्या घरापुढे केली जीआरची होळी; गोंडगोवारी समाजबांधवांनी घातला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 12:29 PM

Bhandara : अभ्यास समितीच्या मुदतवाढीवरून शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गोंडगोवारी जमातीचा अभ्यास करण्यासही सेवानिवृत न्यायाधीश के. एल. वडणे यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यांपूर्वी गठित केलेल्या समितीद्वारे अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, या कालावधीत कोणतीही कार्यवाही न झाल्याने तसेच पुन्हा या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढीचा निर्णय शासनाने घेतल्याने गोंडगोवारी समाजबांधवांनी आक्रमक पवित्रा उचलला. दरम्यान, आमदार नरेंद्र भोंडेकर यांना घेराव घालून त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापुढे जीआरची होळीही केली.

राज्य सरकारच्या चालढकल कारभाराबाबत गोंडगोवारी समाज बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी ११ वाजता आमदार भोंडेकर यांना त्यांच्या राहत्या घरी घेराव घातला. दोन महिन्यांच्या मुदतवाढीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर शासन निर्णयाच्या प्रतीची होळी केली. या समितीला ६ महिन्यांत अहवाल सादर करावयाचा होता, मात्र निर्धारित कालावधीत ही कार्यवाही पूर्ण न झाल्याने ६ सप्टेंबरला पुन्हा या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याने नाराजी आहे. याप्रसंगी संघटनेचे हेमराज नेवारे गोवर्धन काळसर्पे, दुधराम मानकर प्रभाकर येसनसुरे, विकास नागोसे, विजय वाघाडे, गोपाल राऊत, उमराव कोहळे, काशिनाथ राऊत, जागेश्वर चामलाटे, प्रभाकर नेवारे, कृष्णा कोहळे आदी उपस्थित होते.

७० वर्षांपासून संघर्ष मागील ७० वर्षांपासून गोंड गोवारी जमात संघटना आपल्या संवैधानिक हक्कासाठी लोकशाही मागो संघर्ष करीत आहे. या संदर्भात २६ जानेवारीपासून नागपुरातील संविधान चौकात १७ दिवस बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभ्यास समिती गठित करण्याचा निर्णय झाला होता.

टॅग्स :bhandara-acभंडारा