लाखांदूर : प्रत्येकांचे एक सुंदर सोनेरी स्वप्न असते की, आपलं हक्काचं छोटसं का होईना पण एक सुंदर घर असावं, पण हे स्वप्न पूर्ण करण्यात घर बांधकामाच्या वस्तु रेती, विटा, सिमेंट, कामगार यांच्या वाढत्या महागाईमुळे आर्थिक बजेट बिघडत आहे. त्यामुळे घर बांधकामात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे गरिबांचे घर बनविण्याचे स्वप्न स्वप्नच राहील का, असा प्रश्न गरीबांना होत आहे.सध्या बऱ्याच गावामध्ये इंदिरा आवास योजना, रमाई घरकुल योजना, अशा योजनांच्या माध्यमातून घरकुल बांधकामाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने घर बांधणीसाठी विटा, रेती, सिमेंट, लोहा, मजूर यांची वाढती मागणी लक्षात घेता भाव वधारले असल्याने अनेक गरीब लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी खूप तडजोड करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत सगळीकडे वस्तुची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विटा, रेती मजूर सुद्धा उपलब्ध नसल्याने अनेकांचे घर बांधकाम थांबविले आहे. विटांचे भाव गगणाला भिडले आहे. ३,४०० ते ३,५०० रूपये मोजूनही विटा मिळवणे कठिण झाले आहे. विट भट्टी ठेकेदारांना पैसे मोजून नगदी विटा खरेदी कराव्या लागत आहे. त्यामुळे गरिबांचे दिवस आले आहेत, असे म्ॅहणत असले तरीही गरीबांचे घर बांधण्याची स्वप्न पूर्ण होणे महत्वाचे आहे. (शहर प्रतिनिधी)
वाढत्या किमतीमुळे घर बांधकाम झाले कठीण
By admin | Published: June 03, 2015 12:41 AM