लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बावणे कुणबी समाज सेवा मंडळ जिल्हा भंडाराच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संत तुकाराम सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले हे होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे, कुणबी समाजाचे मुख्य प्रवर्तक दादा टिचकुले, जिल्हा परिषदेचे सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते उपस्थित होते.यावेळी त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांची मूर्ती व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक प्रा.उमेश सिंगनजुडे तर सत्कारमूर्ती केशव बांते यांचा शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुणबी समाजातील चवथी ते सातवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्यप्राप्त व दहावी व बारावी आणि पदवी व पदव्युत्तरमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा आणि अपेक्षा शेंडे हिने एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण करुन आरएफओपदी नियुक्ती झाल्यामुळे तिचासुध्दा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक सदानंद इलमे यांनी केले. यावेळी खासदार नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले. नरेश डहारे म्हणाले, समाज आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्याकरिता शैक्षणिक दर्जा उंचावण्याची गरज असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे आयोजक मनोज बोरकर, राजेंद्र राखडे, दिवाकर मने, महेश कुथे, अॅड. रवि वाढई, केशव बांते, गोपाल सेलोकर, दिनेश पिकलमुंडे, मुख्य कार्यकारणीचे अध्यक्ष सदानंद इलमे, सचिव प्रभु मने, उपाध्यक्ष तुकाराम बेदरकर, पांडूरंग खाटीक, कोषाध्यक्ष प्रदीप कढव, मधुकर चौधरी, धनराज झंझाड, मंगला डहाके, रोशन पडोळे, कांता बांते, मंजुषा बुरडे, सुर्यकांत ईलमे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली बाते उपस्थित होत्या. संचालन मनोज बोरकर यांनी तर आभारप्रदर्शन युवा समितीचे उपाध्यक्ष गोपाळ सेलोकर यांनी केले. कार्यक्रमाला बावणे कुणबी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:25 AM
बावणे कुणबी समाज सेवा मंडळ जिल्हा भंडाराच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संत तुकाराम सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले हे होते.
ठळक मुद्देबावणे कुणबी समाजाचे आयोजन : कार्यकर्त्यांनाही केले सन्मानित