मोहाडी : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण मोहाडी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोना काळात मोहाडी तालुक्यात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
ग्रामपंचायत निवडणूक काळात मेहनत घेणारे मोहाडी येथील निवडणूक विभागात कार्यरत संगणक ऑपरेटर सचिन सेलोकर (मांढळ) यांचा उत्कृष्ट ऑपरेटर म्हणून, आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा निरंजना धनराज वनवे (आंधळगाव), बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रेखा रमेश कुंभलकर (रोहा), वरठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा शारदा शीलव फुले (वरठी), धोप येथील सहायक शिक्षक बाळासाहेब मुंडे, अतिरिक्त तहसीलदार देविदास बोबुर्डे, तलाठी विद्या समरीत कुशारी, निरंजनी मदनकर (नेरी), कीर्ती अमृते (मोहंगावबुज), निखील गजभिये (पाचगाव),पराग तितिरमारे (वरठी),रवींद्र साळुंखे (सातोना),युवराज उके, महसूल विभागातील कृष्णा आकरे, चंद्रशेखर भोंगाडे, गजानन नान्हे, शरद बोरकर, जयवंता सव्वालाखे, निवडणूक विभागाचे प्रमुख चंद्रकिशोर मरसकोल्हे, संगणक ऑपरेटर सचिन सेलोकर (मांढळ),विलास हेडाऊ (कोदामेंढी) यांना तहसीलदार मिलन करणवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला आमदार राजू कारेमोरे, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, मोरेश्वर हुकरे, विजय बोरकर उपस्थित होते. यावेळी यशवंत थोटे, सिराज शेख, गिरीधर मोटघरे, नरेंद्र निमकर, अफरोज पठाण, मंडल अधिकारी आर. व्ही. मडामे, तलाठी आशिष टेकाम, सागर बावरे, माधुरी कावळे, शिल्पा डोंगरे, रामनारायण धकाते, आनंद हट्टेवार, युवराज गणवीर, महेश मानकर, निशा शर्मा, विनायक नंदनवार, नरेश चव्हाण, मयूरी मातटूरकर, श्रध्दा ठोंबरे, तृप्ती पाटील, शरद बोरकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शरद कोराम, धनराज शेंडे, विठोबा बावणे, हितेंद्र रहांगडाले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांनी केले तर प्रशांत गजभिये यांनी आभार मानले.