शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

आशा कार्यकर्ता, परिचारिकांचे कार्य मोलाचे

By admin | Published: August 24, 2016 12:18 AM

आशा कार्यकर्ता व परिचारिका या खऱ्या अर्थाने रुग्णाची मोठी सेवा करतात.

डेंग्यू प्रतिरोध मोहीम जनजागृती : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादनकोंढा (कोसरा) : आशा कार्यकर्ता व परिचारिका या खऱ्या अर्थाने रुग्णाची मोठी सेवा करतात. अडीअडचणीत व खडतर मार्ग असले तरी त्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत रुग्णांना आणण्याचे कार्य करतात म्हणून त्या सर्वाच्या सिस्टर आहेत. असे उद्गार प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे डेंग्यू प्रतिरोध मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमात आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डेंग्यू प्रतिरोध महिना जनजागृती कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विविध निबंध, रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या रेखा भुसारी अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पवनी तालुका भाजपाध्यक्ष के. डी. मोटघरे, प्राचार्य जी. के. वैद्य, प्राचार्य इ. एम. गहाणे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. झलके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम, प्रा. सी. एम. बावने, बळीराम रघुते, डॉ. प्रभाकर लेपसे, सरपंच मालची माया तलमले उपस्थित होत्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी जून ते आॅक्टोंबर महिन्यात आरोग्य विभागातर्फे घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांगर्तत घेण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. डॉ. प्रभाकर लेपसे यांनी डेंग्यू प्रतिरोध महिण्यात २६ गावात स्वच्छता अभियान, १६ गावात चित्रकला स्पर्धा, कोंढा आठवडी बाजारात प्रदर्शन, १६ गावात सर्वेक्षण, ७४२ लोकांचे रक्तांचे नमुणे तपासण्यात आले. असल्याचे सांगून या कार्यात वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले. डेंग्यू प्रतिरोध मोहिमेवर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर तालुक्यात निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक तनूजा बबन जांभूळकर व काजल गजानन जासूद यांनी मिळविले. द्वितीय क्रमांक दिपक डहाके व लोकेश पंढरे यांनी मिळविले. तृतीय क्रमांक श्रध्दा मुर्कने, राखी सोनटक्के, प्रतीक सोनटक्के, काजल हुकरे, गायत्री शिवणकर, रिना नागपुरे यांचे आले. सर्वांना आमदार अ‍ॅड. अवसरे यांच्या हस्ते रोख पुरस्कार व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. रांगोळी स्पर्धेत प्रथम निहार जिभकाटे, द्वितीय सुरेखा कुर्झेकर, तृतीय रंजनी भुरे, चतूर्थ श्रेया ठाकरे यांना देण्यात आले. त्यांना देखील अ‍ॅड. अवसरे यांचेहस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर लेपसे यांनी केले. संचालन डॉ. थेरकर आभार डॉ. तलमले यांनी मानले. दिप मेडीकल कोंढा, अनुराग मेडीकल कोंढा व डयगोन्स्टीक पॅथॉलॉजी लॅब, कोंढा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमास आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ता व विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. (वार्ताहर)