बॉक्स
अपडेट वेळेत मिळावेत
१) तंत्रज्ञानाचे युग असल्याने शेतकऱ्यांनाही विविध माहिती वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे.
२) आजच्या तुलनेत पूर्वीच्या काळी मोबाईलसह इतर साधने कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागत होत्या. मात्र, आता साधनांमुळे माहिती तंत्रज्ञान अपडेट होणे गरजेचे आहे.
३) वारा, वादळ याविषयी माहिती उपलब्ध होण्यास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाजारपेठेचीही माहिती उपलब्ध होते. ही माहिती नेहमी अपडेट असावी.
बॉक्स
किसान ॲपवर काय काय माहिती मिळते
१) किसान ॲपवर शेतकऱ्यांना शेतीशी आवश्यक संपूर्ण माहिती मिळते.
२) हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती तसेच या ॲपद्वारे उपलब्ध होत असल्याने हवामानातील विविध बदलांनुसार शेतकऱ्यांना कामे करता येतात.
३) पीकपाणी, पिकांवरील रोगाविषयीदेखील माहिती मिळत असल्याने पिकांचे संरक्षण होऊन नुकसान टाळता येते.
४) हवामान, पिकावरील रोग राहिल्यास व अन्य आवश्यक माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो.
बॉक्स
कृषी विज्ञान केंद्राबद्दल नाराजी
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे तसेच त्यांची शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी शासनाने जिल्ह्यात साकोली येथे कृषी विज्ञान केंद्राची उभारणी केली. मात्र, शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे तंत्रशुद्ध मार्गदर्शन होत नसल्याची अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे. शासन लाखो रुपये कृषी शास्त्रज्ञांसह कृषी विज्ञान केंद्रांवर खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात याचा काहीच उपयोग होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे
कोट
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आज प्रत्येक शेतकरीही तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी आवश्यक सर्व माहिती कृषी ॲपद्वारे मिळते. मात्र, यात अनेकदा अडचणी येतात. त्या दूर व्हाव्यात.
किशोर ठवकर, शेतकरी.
कोट
किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे संदेश महत्त्वाचे आहेत. मात्र, अनेकदा तांत्रिक समस्येमुळे हे संदेश उशिराने मिळतात. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.
देवानंद लांजेवार, शेतकरी
कोट
जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहे. मात्र, या कृषी केंद्रातर्फे शेतकऱ्यांना म्हणावी त्या तुलनेत जनजागृती करताना दिसून येत नाही. तसेच कोणते वाण चांगले व कोणते घेऊ नये याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन कृषी केंद्रातर्फे होताना दिसत नाही.
संदीप गोस्वामी, शेतकरी