भंडारा नगरपरिषदेच्या हद्दीतील घोड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सदर नमुने पॉझिटिव्ह असल्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना कळविण्यात आले आहे. हा रोग प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत अधिसूचित आहे. या रोगाची लागण मानवास होत असल्याने, अश्ववर्गीय जनावरांमध्ये या रोगाचा फैलाव होणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतली आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी शिवराज पडोळे यांनी शनिवारी एक आदेश पारित केला. त्यानुसार, जिल्हा बाहेरील अश्ववर्गीय प्राणी जसे घोडे, गाढव खेचत जिल्ह्यात येणार नाही आणि जिल्ह्यातील या प्राण्यांची वाहतूक होणार नाही, असे आदेश दिले आहे. यासोबतच अश्ववर्गीय प्राण्यांना बाजार, जत्रा, पशुप्रदर्शन आणि लग्नसोहळ्यातही आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.
भंडारात घोड्यांना ग्लॅडर्स रोगाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:33 AM