लाखांदूर तालुक्यात जवळपास सात वसतिगृहे आहेत. त्यामध्ये सहा खाजगी अनुदानीत तर एक शासकिय वसतिगृहाचा समावेश आहे. त्यानुसार तालुक्यातील बारव्हा येथे 2, पारडी -1 व लाखांदूर येथे एक शासकीय तीन 3 खाजगी अनुदानीत वसतिगृह असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या वसतिगृह अंतर्गत तालुक्यातील बहुसंख्य गारुब विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. मात्र शाळा महाविद्यालय सुरु होउन महिना लोटत असतांना देखील तालुक्यातील एकही वसतिगृह सुरु न झाल्याने गरिब विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना संकटामुळे शिक्षणाचे तीनतेरा वाजले असतांना अनेक कुटूंब आर्थिक संकटात देखील असल्याचे बोलले जात आहे.अशातच अर्धसत्र लोटल्यानंतर शाळा महाविद्यालये सुरु होतांना वसतिगृह सुरु न झाल्याने विद्यार्थ्याविना वसतिगृह ओस पडल्याचे दिसत आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवुन वसतिगृहात शालेय शिक्षण घेणा-या गरिब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याहेतू बंद पडलेली वसतिगृहे सुरु करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकातून केली जात आहे.