बॉक्स
जार विक्री घटल्याने रोजगारावर परिणाम
भंडारा शहरात नगरपरिषदेकडून होत असलेला पाणीपुरवठा हा स्वच्छ नसल्याने, शहरात जार विक्रीचा व्यवसाय जोमात होता. अनेकांकडून फिल्टर पाण्याची मागणी वाढली होती. मात्र, आता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ठिकाणी सुरू केलेले जार विक्री थंडबस्त्यात आहे. त्यामुळे शासकीय कार्यालय, घरगुती कार्यक्रम, तसेच संचारबंदीचा परिणाम जार विक्रेत्यांवर झाला आहे.
बॉक्स
घरपोच सेवेला नापसंती
सध्या कोरोना संसर्गामुळे अनेक जण थंड पाणी पीत नाहीत. थंड पाणी पिण्याचे अनेक जण टाळत आहेत. त्यामुळे जारऐवजी सध्या साध्या पाण्यालाच अनेकांनी पसंती दिली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कोट
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जारच्या थंड पाण्याला प्रचंड मागणी असायची. इतक्या ऑर्डर असायच्या की, वाटप करताना पूर्ण नियोजन सांभाळणे कठीण व्हायचे. मात्र, जसा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तेव्हापासून ते आता संचारबंदीमध्ये अनेक हॉटेल बंद आहेत. लग्नकार्य होत नाहीत. त्यामुळे जारची मागणी पूर्णच घटली आहे. त्यामुळे व्यवसायाला फटका बसत आहे.
जार विक्रेता, भंडारा
कोट
माझा हॉटेलचा व्यवसाय आहे. हॉटेल सुरू होते, तेव्हा दररोज दहा ते पंधरा जार विकत घ्यावे लागत होते. संचारबंदीमुळे हॉटेल बंद आहेत. कोरोनामुळे थंड पाणी पिणे अनेक जण टाळत आहेत. त्यामुळे आता आम्ही जार मागवत नाही.
ॲड.विजय नंदागवळी, हॉटेलमालक, साकोली
कोट
कडक उन्हातही सध्या थंड पाणी पिणे बंद आहे. त्याऐवजी सध्या साधे फिल्टर केलेले पाणी पिण्यास आम्ही पसंती देत आहोत. एप्रिल महिन्यात प्रचंड कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याने घरचेच पाणी पिणे केव्हाही चांगले. सर्वांनी कोरोनात स्वत:ची काळजी घ्यावी.
आर.एस.बारई, मुख्याध्यापक, नूतन महाराष्ट्र विद्यालय, भंडारा.