लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रंगबेरंगी फुल, फुग्यांनी सजलेले सभागृह, शुभेच्छा अन् भेटवस्तुच्या संस्कृतीला बाजूला सारून वरठी येथील कलश मारवाडे या बालकाने अनाथ आश्रमातील मुलांसमवेत वाढदिवस साजरा केला. वेगवेगळपण असणाऱ्या वाढदिवसाच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.वाढदिवस आयुष्यातला उत्साहाचा दिवस मानला जातो. आई-बाबांना तर मुलांच्या वाढदिवसाचे लाड करण्यासाठी पार्टी आयोजित करतात. पार्टी दिली नाही तर लोक हसतील, कंजूस म्हणतील ही सामाजिक भिती असतेच. मग, श्रीमंती दाखविण्याच्या नादात हजारो रूपये खर्च केले जातात, पण कलश मारवाडे या मुलांच्या डोक्यातून निघालेल्या कल्पनेला साकारणाºया त्यांच्या आई-बाबांनी भंडारा येथील बापू का आश्रम येथे जावून अनाथ मुलांसह वाढदिवस साजरा केला. कलश मारवाडे हा सनफ्लॅग वरठी येथील इंग्लीश शाळेत पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहे.शाळेत वाढदिवसाविषयी गप्पा मारताना कलशच्या मनात ही नवलाईची कल्पना सुचली. त्याने ती कल्पना आईला सांगितली. मला, माझ्या वाढदिवसाला नवीन कपडे नकोत, भेटवस्तू पण नको, आपण सगळे अनाथ मुलांकडे जावून वाढदिवस साजरा करूया असे सांगितले.आर्इंनी भंडारा येथील बापू का आश्रम येथील अनाथलयाला भेट घेतली. तेथील प्रमुखांची वाढदिवस साजरा करण्याची परवानगी घेण्यात आली.अनाथ मुलां-मुलीसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. परीक्षा बोर्ड, ही भेट अनाथ मुलांना देण्यात आली. वंचित, उपेक्षित असे जीवन जगणाºया अनाथ मुलांच्या चेहºयावर हास्य फुलवले. सक्षम अशी परिस्थिती असताना समाजाच्या अपेक्षेप्रमाणे मुलांचा मोठा वाढदिवस साजरा करू शकले असते. पण, मुलाच्या कल्पनेतून निघालेल्या कौतुकास्पद वाढदिवसाचे त्यांच्या आई बाबांनी मुलांचा अभिमान अन् कौतुक तर केलेच दुसºयांनाही प्रेरणा दिली.
अनाथांच्या हास्यात ‘त्याने’ शोधला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:58 PM
रंगबेरंगी फुल, फुग्यांनी सजलेले सभागृह, शुभेच्छा अन् भेटवस्तुच्या संस्कृतीला बाजूला सारून वरठी येथील कलश मारवाडे या बालकाने अनाथ आश्रमातील मुलांसमवेत वाढदिवस साजरा केला. वेगवेगळपण असणाऱ्या वाढदिवसाच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
ठळक मुद्देकौतुकास्पद : झगमटाला फाटा, साहित्य भेट