शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

पावसात घर पडले तरी घरकूल मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 10:25 PM

चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत कोसळल्याने पत्नीसह दोन मुले जखमी झाले.

ठळक मुद्देचार वर्षांपासून प्रतीक्षा : ढोलसर येथील चौधरी परिवाराची व्यथा, प्रशासनाचे दुर्लक्ष

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत कोसळल्याने पत्नीसह दोन मुले जखमी झाले. आता तरी ग्रामपंचायत घरकुलासाठी पुढाकार घेईल काय? असा सवाल पडलेल्या घराकडे शून्य नजरेने पाहत बिसन चौधरी करीत आहेत.ढोलसर गावात गत तीस वर्षांपासून बिसन चौधरी आपल्या कुटुंबासोबत राहतात. पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. भूमीहीन असलेला बिसनचा परिवार मोलमजुरीवर चालतो. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाढा ओढताना घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे दमडीही शिल्लक राहत नाही. मजुरीवर घर बांधणे जमले नाही. त्यातच शासनाच्या घरकुलाची योजना आली. चार वर्षापासून बिसन घरकुलाची मागणी करीत आहेत. परंतु त्याला अद्यापही घरकुल मिळाले नाही. गतवर्षी ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर झाले असे सांगत बँकेत खाते उघडण्यास सांगितले. ग्रामीण बँकेत खाते काढले तर ग्रामीण बँकेचा खाते क्रमांक चालत नाही म्हणून पुन्हा बँक आॅफ इंडियाच्या शाखेत खाते उघडायला लावले. त्यानंतरही पुन्हा स्टेट बँक आॅफ इंडियात खाते उघडण्यास भाग पाडले. असा मानसिक त्रास सहन करीत चौधरी आपल्या मोडक्या घरात राहत आहेत. तीन दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसात मंगळवारी सकाळी त्यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे पत्नी मीराबाई, मुलगा छगन व गुणीराम जखमी झाले.घर कोसळल्याची माहिती ग्रामपंचायतीला होताच पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. प्रकरण आपल्यावर येईल म्हणून घरकुलासाठी धावपळ करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले.एका कुटुंबाचा प्रशासनाने असा छळ मांडल्याने गावात संताप व्यक्त होत आहे.दोषींवर कारवाई करण्याची मागणीघरकुलापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बिसन चौधरी यांनी केली आहे. तसेच तात्काळ घरकुल मंजूर करून आपल्याला घरकुल द्यावे अशीही मागणी आहे. आता बिसनला घर केव्हा मिळते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.