शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

घरगुती सिलिंडरचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:36 PM

चहा बनविण्यासाठी गॅस पेटविताच रेग्युलेटरला क्षणात आग लागली. कळण्याच्या आतच या आगीने मोठे स्वरूप घेतले. मात्र तरूणतुर्क मुलाने धाव घेत पेटता सिलिंडर घराबाहेर नेला. आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला. ही घटना शहापूर येथील आंबेडकर वॉर्डात रमेश भोंदे यांच्याकडे घडली.

ठळक मुद्देशहापुरातील घटना : सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : चहा बनविण्यासाठी गॅस पेटविताच रेग्युलेटरला क्षणात आग लागली. कळण्याच्या आतच या आगीने मोठे स्वरूप घेतले. मात्र तरूणतुर्क मुलाने धाव घेत पेटता सिलिंडर घराबाहेर नेला. आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला. ही घटना शहापूर येथील आंबेडकर वॉर्डात रमेश भोंदे यांच्याकडे घडली.सकाळी ६ वाजताच्या सुमारास भोंदे यांच्या पत्नी या चहा बनविण्यासाठी स्वयंपाकगृहात गेल्या. लायटरने बर्नरला पेटविताच क्षणातच रेग्युलेटरलाही गॅस लिकेजमुळे आग लागली. याचवेळी त्यांनी आरडा ओरड केल्याने त्यांचा मुलगा प्रवीण धावत आला. स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवीणने पेटता सिलिंडर घराच्या बाहेर काढला. यावेळी सिलिंडरमधून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ निघत होते. पाणी, ओली वाळू, पाण्याने भिजलेली पोती टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग विझली नाही. याचवेळी गावातील रहिवासी नरेंद्र पालांदूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अग्नीशमन बंब पाठविले. त्यानंतर आग आटोक्यात आली. ३० ते ३५ मिनिट सिलिंडरमधून आगीचे लोळ बाहेर निघत असल्याने सर्वांचा जीव टांगणीला होता. घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पंचनामा करण्यात आला आहे. यासंदर्भात सदोष गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांवरही कारवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.