शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

गृहिणी ते जि.प. अध्यक्षपदापर्यंत प्रवास

By admin | Published: July 18, 2015 12:34 AM

देशात व राज्यात भाजपची लहर असताना भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चमत्कार घडवून आणला.

अंबर दिवा मुरमाडीत : गिलोरकर म्हणाल्या, आता सर्व वेळ जनतेसाठी!चंदन मोटघरे लाखनीदेशात व राज्यात भाजपची लहर असताना भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चमत्कार घडवून आणला. कधी स्वप्नातही आपण राज्यमंत्री दर्जा असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनू असे ध्यानीमनी नसताना एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. गृहिणी ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा आता भाग्यश्री गिलोरकर यांचा प्रवास सुरू झाला आहे. गिलोरकर यांच्या रुपाने मुरमाडीला अध्यक्षपद मिळाल्यामुळे गावात उत्साह आहे.भाग्यश्री गिलोरकर या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील आमगाव जवळच्या नवीन लाडज येथील शेषराव भोयर यांची द्वितीय कन्या आहेत. मुरमाडी (तुपकर) येथील रहिवाशी भाऊराव गिलोरकर यांच्याशी त्यांचा ४ आॅगस्ट १९९९ रोजी विवाह झाला. अवघ्या दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या गंगासागर भोयर यांचे सासरी ‘भाग्यश्री’ हे नाव ठेवण्यात आले. मुलगा शंतनु हा आठवीत तर मुलगी कल्याणी ही दहावीत शिकत आहे. स्वस्त धान्य दुकान व विटा व्यवसायावर गिलोरकर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालायचा. हा व्यवसाय आजही सुरूच आहे. भाऊराव हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असून १० वर्षांपूर्वी मुरमाडी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली. सामाजिक कार्यात आवड असल्यामुळे गिलोरकर दाम्पत्यांचा घराघरांत व्यापक जनसंपर्क आहे. या व्यापक जनसंपर्काच्या बळावर काँग्रेसचे नेते सेवक वाघाये यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध बडे उमेदवार रिंगणात असल्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागली. धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या लढाईत त्या विजयी झाल्या. अध्यक्ष बनल्यानंतर सदर प्रतिनिधीने मुरमाडी येथे त्यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, उच्चशिक्षित नसलो तरी सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. गरीब व वंचित महिलांच्या उन्नतीसाठी उपक्रम राबवून त्यांचे सक्षमीकरण करणार असल्याची ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.