आरोग्य कर्मचारी असो व पोलीस कर्मचारी सध्या गेल्या अनेक दिवसांपासून काहींना सुट्टी मिळत नसल्याने अनेक जण त्रासले आहेत. एकीकडे कर्तव्य बजावावे लागत आहे तर दुसरीकडे वेळी-अवेळी लागणारी ड्युटी व वाढत चाललेला कोरोना यामुळे अनेकांना आपल्या आवडी-निवडी छंद जोपासायला वेळच मिळत नसल्याचे वास्तव आहे. मात्र दररोजचे कर्तव्य निभावत असतानाही आपल्या आवडी-निवडी तसेच छंद जोपासणेही गरजेचे असल्याचे मत मानसिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बॉक्स
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
गत वर्षभरापासून कोरोना संसर्गाचे संकट घोंगावत आहे. अशा स्थितीत अनेक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य निभावत असताना ताण येणे सहाजिक आहे. मात्र हा ताण कमी करण्यासाठी आपल्या विविध आवडी, निवडींसह छंद जोपासा. तसेच मोबािलचा अतिवापर टाळा. कुटुंबालाही वेळ देणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. घरातील नियोजनासंबंधी एकमेकांची मते घ्यावीत.
कोट
नागरिकांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे. एक वर्षापासून आम्ही कुटुंबीयांनाही पुरेसा वेळ देऊ शकलेलो नाही. अनेक दिवसांपासून रुग्णांची न थकता सेवा करत आहोत. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेऊन प्रशासनावरील ताण कमी करावा.
- वैशाली राऊत, नर्स, भंडारा
कोट
आम्ही गेल्या वर्षभरापासून रुग्णांची सेवा करत आहोत. त्यामुळे कामाचा ताण वाढतच आहे. तर दुसरीकडे कुटुंबीयांसाठी वेळ देणेही मुश्कील होत आहे. आशा वर्कर कामे करत असताना अनेकदा वेळेकडे पाहून काम करता येत नाही. कुटुंबीयांची मदत मिळत असल्याने मुलांची जबाबदारी हलकी झाली आहे.
- सुलभा नागदेवे, आशा वर्कर,भंडारा
कोट
सर्व नागरिकांनी कोरोना परिस्थिती नियंत्रित येईपर्यंत विनाकारण घराबाहेर पडू नये. पोलीस प्रशासनासह प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
- स्वप्निल गुल्हाने, वाहतूक कर्मचारी
कोट
पोलिसांचे काम हे ताणतणावाचे असतेच. दिवसभर कर्तव्य निभवावे लागतेच. अशा वेळी नागरिकांनीही स्वत:हून नियमांचे पालन केल्यास पोलीस कर्मचाऱ्यांवरीलही अतिरिक्त ताण कमी होऊ शकतो.
- पोलीस कर्मचारी, भंडारा