जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. दोन उपजिल्हा रुग्णालये आहेत. याशिवाय सात ग्रामीण रुग्णालये अशी तगडी यंत्रणा आरोग्य सेवेत काम करीत आहे. या ठिकाणी काम करताना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञांची पदेच नाहीत. यामुळे बालरोगतज्ज्ञ नसल्याने या केंद्रांवर उपचार होणार नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये सात बालरोगतज्ज्ञ आहेत. लहान मुलांच्या एकूण संख्येच्या तुलनेत बालरोगतज्ज्ञांचा हा आकडा फारच कमी आहे, तर दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालय सर्वात मोठी यंत्रणा जिल्हास्तरावर उपलब्ध आहे. या ठिकाणी केवळ सात बालरोगतज्ज्ञ पदे भरलेली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार करता बालरोगतज्ज्ञांचा हा आकडा अपुरा आहे. तिसऱ्या लाटेत उपलब्ध मनुष्यबळ तोकडे पडणार आहे. यामुळे शासकीय यंत्रणेला तत्पूर्वी तात्पुरत्या स्वरूपाचे बालरोगतज्ज्ञ पद भरावे लागणार आहे.
बॉक्स
ग्रामीण भागातील स्थिती वाईट
आरोग्याच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बाल रोगतज्ज्ञाचे एकही पद भरलेले नाही. यामुळे ग्रामीण भागात एखादा छोटा मुलगा आजारी पडला तर त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याशिवाय पर्याय नाही.
बॉक्स
१०
आयसीयू बेडचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. ग्रामीणसह शहरी भागात ही अतिरिक्त बेडची व्यवस्था असणार आहे. याशिवाय आवश्यकता भासल्यास मंगल कार्यालये आणि मोठ्या जागा आरक्षित करून त्या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहेत. यामुळे परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
बॉक्स
बालकांच्या लसीकरणाची पडताळणी सुरू
बालकांना त्यांच्या वयोमानानुसार नियमित लसीकरणाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व लसी दिल्या की नाहीत, याची पडताळणी सुरू आहे. पुढील काळात या बालकांना कोविड संसर्ग झाल्यास इतर आजारांमुळे गुंतागुंत वाढू नये, याकडेदेखील आरोग्य विभाग लक्ष देत आहे. सोबतच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षितही केले जात आहे. कोविड केअर सेंटर आणि ऑक्सिजन बेडची सुविधा तयार करण्यात आली. आरोग्य विभागाने परिश्रम घेत कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यात यश मिळविले. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, ऑक्सिजन प्लांट, लसीकरण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
कोट
जिल्हास्तरावर १० आयसीयू बेडचे नियोजन केले आहे. सध्या उपचारासाठी लागणारे बालरोगतज्ज्ञ आरोग्य विभागाकडे आहे. आवश्यकता भासल्यास इतर ठिकाणावरचे बालरोगतज्ज्ञ घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, ऑक्सिजन प्लांट व बेडची व्यवस्था वाढविण्यात आली आहे. लहान मुलांच्या नियमित लसीकरणाची पडताळणी करून शासन निर्देशानुसार उपचार करण्यात येत आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा