बॉक्स
जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास
भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे वरठी, तुमसरकडे जाणारी वाहने याच मार्गाने जात असल्याने या मार्गावर अनेकदा गर्दी असते. यासोबतच रविवार आणि बुधवारी गर्दीने वाहतूक कोंडी होते. मात्र, याकडे भंडारा नगर परिषद, पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
बॉक्स
शहरातील फुटपाथ नावालाच
भंडारा शहरातील बसस्थानक ते गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, खात रोड परिसरात प्रमुख रस्त्यांवर असलेले फुटपाथ हे कागदावरच दिसून येत आहेत. या प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून, रहदारीसाठी रस्ता अरुंद ठरत आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र, याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
बॉक्स
अतिक्रमण हटाव मोहीम राबवा
भंडारा नगर परिषदेने शहरातील बसस्थानक ते गांधी चौक, तसेच मुस्लिम लायब्ररी चौक राजीव गांधी चौक व खात रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक दुकानांसमोर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होते. त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणीही जोर धरत आहे. भंडारा नगर परिषदेने फिरत्या पथकाची नेमणूक करून अतिक्रमण केलेल्या जागांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोट
भंडारा शहरातून पायी चालताना भीती वाटते. भंडारा शहरातून मोठा बाजार परिसर, बसस्थानक, खात रोड, खाम तलाव चौक परिसरात पायी चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेकदा वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न व अरुंद रस्त्यावरून जाताना समोरून येणारे वाहन आपल्याला धडक मारते की काय असा भास होतो.
विवेक मेश्राम, भंडारा