शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

मोठ्या बाजार परिसरात पादचाऱ्यांनी चालायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:40 AM

बॉक्स जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा ...

बॉक्स

जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास

भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे वरठी, तुमसरकडे जाणारे वाहने याच मार्गाने जात असल्याने या मार्गावर अनेकदा गर्दी असते. यासोबतच रविवार आणि बुधवारी गर्दीने वाहतूक कोंडी होते. मात्र, याकडे भंडारा नगरपरिषद,पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

बॉक्स

शहरातील फूटपाथ नावालाच

भंडारा शहरातील बसस्थानक ते गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, खात रोड परिसरात प्रमुख रस्त्यांवर असलेले फूटपाथ हे कागदावरच दिसून येत आहेत. या प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून रहदारीसाठी रस्ता अरूंद ठरत आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र, याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

बॉक्स

अतिक्रमण हटाव मोहीम राबवा

भंडारा नगरपरिषदेने शहरातील बसस्थानक ते गांधी चौक तसेच मुस्लिम लायब्ररी चौक राजीव गांधी चौक व खात रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक दुकानांसमोर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होते. त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणीही जोर धरत आहे. भंडारा नगरपरिषदेने फिरत्या पथकाची नेमणूक करून अतिक्रमण केलेल्या जागांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोट

भंडारा शहरातून पायी चालताना भीती वाटते. भंडारा शहरातून मोठा बाजार परिसर, बसस्थानक, खात रोड, खाम तलाव चौक परिसरात पायी चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेकदा वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न व अरुंद रस्त्यावरून जाताना समोरून येणारे वाहन आपल्याला धडक मारते की काय असा भास होतो.

विवेक मेश्राम, भंडारा

ब्रह्मकमळ उमलले : भंडारा शहरातील एमएसईबी कॉलनीस्थित सेवानिवृत्त शिक्षक बाळकृष्ण घाटबांधे यांच्या घरी नागपंचमीच्या संध्याला ब्रह्मकमळ उमलले. ‘निशोन्मीलित’ अशा या ब्रह्मकमळाची शोभा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी जमा झाले होते.

तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. परशुरामकर यांची निवड

साकोली : तालुका वकील संघ साकोलीतर्फे घेण्यात आलेल्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. ए. पी. परशुरामकर यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. बी. एन. संग्रामे, सचिव म्हणून ॲड. शरद बोरकर यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. हटवार म्हणून काम पाहिले. डॉ. संजय मेश्राम यांना इंटरनॅशनल सायंटिस्ट अवॉर्ड

साकोली : येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील डॉ. संजय मेश्राम यांना इंटरनॅशनल सायंटिस्ट अवॉर्ड इंजिनियरिंग अँड मेडिसिन अंतर्गत ७ ऑगस्टला पाँडेचरी येथे तरुण संशोधक पारितोषिकाने गौरवण्यात आले. हे पारितोषिक विज्ञान शाखेत तसेच औषधी वनस्पतीशास्त्र अभियांत्रिकी विभागातून दिली जाते. त्यांचे प्राचार्य डॉ. हरेश त्रिवेदी, प्रा. डॉ. शंकर बागडे, डॉ. अमित टेंभुर्णे, डॉ. खापर्डे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार केला.

घरकुल ''ड'' यादीतील पात्र लाभार्थ्यांना न्याय द्या!

लाखनी तालुका सरपंच संघटनेचे निवेदन :

पालांदूर : घरकुल योजनेअंतर्गत पक्के घर मिळावे याकरिता गावच्या ग्रामसभेतून पात्र लाभार्थ्यांची नावे पाठविण्यात आली. मात्र, यादीतील सुमारे २० टक्के पात्र लाभार्थ्यांची नावे कापण्यात आली आहेत. लाखणी तालुक्यातून २००० पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून दूर आहेत. गरिबांना न्याय मिळावा याकरिता लाखणी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले आहे.

संपूर्ण तालुक्यात सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याविरोधात वातावरण तयार झाले आहे. यात ग्रामपंचायतसह सरपंचांचा कोणताही दोष नाही. परंतु शासनस्तरावरून झालेली चूक स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माथी मारल्या जात आहे. गावात कलह तयार होत असून पदाधिकाऱ्यांना गाव कारभार चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गोरगरिबांना पक्या घराकरिता न्याय द्यावा .अशी मागणी सरपंच संघटना लाखनी यांच्यावतीने करण्यात आली आहे.

पालांदूर जवळील मांगली बांध येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार २०१८ ला ग्रामसभेतून २०१ लाभार्थी पात्र ठरले. मात्र, नंतर लाभार्थ्यांची १५१ एवढीच यादी पात्र धरून ४९ लाभार्थी पात्र असूनही अपात्र ठरविण्यात आले. पालांदूर येथे सुद्धा ४६९ पात्र लाभार्थी असून यातील सुमारे पस्तीस लाभार्थ्यांचा सर्व्हे झालेला नसल्याने त्यांचेसुद्धा घरकुल समस्येत आले आहे. असाच प्रकार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये घडलेला आहे.

चौकट

सरपंच संघटनेने यापूर्वीसुद्धा प्रशासन स्तरावरून प्रयत्न चालविले होते; परंतु अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. ऑनलाईन पद्धतीने सध्या सर्वच कारभार सुरू झाला आहे. केंद्र सरकारने यात सहकार्य करून ग्रामीण घरकुल व्यवस्थेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदन देताना लाखणी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष म. वा. बोळणे, नरेंद्र भांडारकर, देवनाथ निखाडे, पंकज चेटुले, सुधाकर हटवार, प्रशांत मासुरकर, संगीता बारस्कर, संगीता घोनमोडे, वीणाताई नागलवाडे, कल्पना सेलोकेर, रसिका कांबळे जयंत बिंझडे आदी उपस्थित होते.

पालांदूरच्या आठवडी बाजाराला परवानगी द्या

व्यापारीवर्गासह जनसामान्यांची मागणी

पालांदूर : जून महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्या अत्यल्प झाली आहे. ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या घटली आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असलेला शनिवारचा पालांदूर येथील आठवडी बाजार सुरू करावा, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांसह जनसामान्यांनी केली आहे. गत चार महिन्यांपासून पालांदूर येथील आठवडी बाजार बंद आहे. कोरोनाचे वाढते प्रस्थ सर्वसामान्यांना धोक्यात आणणारे होते. त्यामुळे गर्दी टाळण्याकरिता शासनाच्यावतीने आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. परंतु जून महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारात शनिवार व रविवारवगळता आठवडी बाजार सुरू करण्यात आले. पालांदूर शेजारील सगळेच आठवडी बाजार सुरू झाले आहेत. मात्र, पालांदूरचा बाजार सुरू न झाल्याने गैरसोय होत आहे. पालांदूर जवळून एक किलोमीटर अंतरावर जागा बदलून काही ठोक व्यापारी भाजीपाल्याचे दुकान थाटतात. त्यामुळे इतर लहान व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे तसेच गोरगरिबांना खरेदीकरिता आठवडी बाजार अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरिता आठवडी बाजार सुरू करावा, अशी मागणी होत आहे.

तिरूपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

साकोली : तालुका प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत मुंडीपार येथील तिरूपती विद्यालय तथा स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. त्यात प्रथम खुशी सुर्यवंशी, तर द्वितीय वैष्णवी सेलोंकर, तृतीय क्रमांक आकांक्षा कुंभरे याने पटकावला. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. ए. सिंगनजुडे, प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रमोद सुर्यवंशी, किरेट सेलोकर, अंबरदास कुंभरे, प्रा. एस. जे. धांडे, प्रा. आर. जे. आग्रे, प्रा. पी. टी. बहेकार, डी. बी. उईके, व्ही. जी. मानकर, ए. आर. तागडे, एन. एन. वाघाये, ए. व्ही. मेश्राम, जे. बी. चेटुले, एस. आर. चिमनकर, के. एस. कडव उपस्थित होते. संचालन प्रा. पी. टी. बहेकार यांनी तर आभार एस. जे. धांडे यांनी मानले.