मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : नागपूर विभागातील मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील कळमना रेल्वेदरम्यान ट्रॅक इंटरलॉकिंगची कामे १४ ते १९ ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूरनंतर सुमारे सहा दिवस रेल्वे प्रवासी गाड्या बंद राहणार आहेत. त्याच्या फटका सुमारे दोन हजार रेल्वे प्रवाशांना बसणार आहे. त्यांना आपल्या मजुरीपासून वंचित राहावे लागणार आहे; परंतु या मार्गावर मुंबई हावडादरम्यान धावणारी गीतांजली एक्स्प्रेस मात्र दररोज सुरू राहणार असल्याची माहिती आहे.
मुंबई हावडा रेल्वे मार्गदरम्यान तिसऱ्या रेल्वे ट्रॅकचे काम सुरू आहे. नागपूरनंतर भंडारा, तुमसर, गोंदिया व पुढील मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने बंद केल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार र असून रेल्वे प्रवासात अस्वस्थता पसरली आहे.
गीतांजली एक्स्प्रेस धावणारमुंबई-हावडादरम्यान धावणारी अतिवेगवान गीतांजली प्रवासी गाडी मात्र दररोज सुरू राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. गीतांजली एक्स्प्रेसला मेगाब्लॉकनंतरही हिरवी झेंडी रेल्वे प्रशासनाने दिली. गोंदिया ते नागपूरदरम्यान प्रवासी रेल्वे गाडी या मार्गावर मेगा ब्लॉकदरम्यान सुरू करण्याची गरजसर्वसामान्य प्रवाशांचा विचार प्रशासनाने केलेला नाही. दररोज प्रवास आहे करणाऱ्या हजारो प्रवाशांत अस्वस्थता पसरली असून त्यांच्यात असंतोष व्याप्त आहे.
दोन हजार कर्मचारी व मजुरांची संख्यातुमसर रोड स्थानकातून दररोज लहान-मोठे कर्मचारी व मजुरांची संख्या दोन हजार असून त्यांना कामापासून मुकावे लागणार आहे. बसने जाणे त्यांना पर- वडणारे नाही. तसेच वेळही येथे अधिक लागणार आहे. त्यामुळे यांना कामापासून मुकावे लागणार आहे.
शिशुपाल पटले यांनी घेतली डीआरएम ची भेटमाजी खासदार शिशुपाल पटले यांनी नागपूर विभागाच्या रेल्वे महाव्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांची नागपूर येथे कार्यालयात भेट घेऊन गीतांजली एक्स्प्रेसच्या थांबा तुमसर रोड रेल्वे स्थानकात मेगाब्लॉक दरम्यान द्यावा, अशी मागणी केली. ज्यामुळे दुग्ध व्यावसायिक व इतर दररोज प्रवास करणाऱ्यांना होईल; परंतु याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार रेल्वे बोर्ड दिल्लीला आहे, असे त्यांनी माजी खासदार पटले यांना सांगितले.
गीतांजलीचा थांबा तुमसरला द्या
- गीतांजली एक्स्प्रेस थांबा भंडारा व गोंदिया येथे आहे; परंतु तुमसर रोड रेल्वे स्थानकात गीतांजली एक्स्प्रेसचा थांबा नाही.
- येथून दूध घेऊन जाणारे लहान व्यावसायिक, कर्मचारी व मजुरांची संख्या मोठी असून मेगा ब्लॉकद- रम्यान त्यांना कामापासून मुकावे लागणार आहे.
- दूध व्यवसायांचे मोठे नुकसान होणार आहे. किमान सहा दिवस दोन मिनिटाच्या गीतांजली एक्स्प्रेस गाडीचा थांबा देण्याची गरज आहे.