सदर सहारा इंडियाविरोधात तुमसर तालुक्यातील ठेवीदारांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. संतप्त झालेल्या खातेदारांनी गुंतवणूक केलेले पैसे परत मिळण्यासाठी शिवसेनेकडे मागणी केली आहे. सहारा इंडिया तुमसर शाखा कार्यालयात खातेदारांना विनाविलंब पैसे देण्यासाठी व्यवस्थापनाने प्रयत्न केला पाहिजे. सहारा इंडियामध्ये गरीब आणि सर्वसामान्य लोकांनी आत्मविश्वासाने पैसे जमा केले आहेत. सदर तालुक्यातील सहारा इंडियाच्या खातेदारांमध्ये विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सहाराने प्रयत्न करावे आणि गुंतवणूक केलेल्या खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी शिवसेनेने भंडारा येथील सहारा इंडिया जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक परशार पांडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत सहारा इंडिया महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक ज्ञानेश्वरसिंग ठाकूर, सहारा इंडिया नागपूर कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत आंबटकर, तुमसरचे शाखा व्यवस्थापक सुशील मेश्राम यांना देण्यात आली आहे. सहारा इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक परशार पांडे यांना निवेदन सादर करतांना शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, सरपंच हिरमण साठवणे सह गुंतवणूकदार उपस्थित होते.