महेश्वरी देवी : विलक्षण दार्शनिक प्रवचनभंडारा : एवढा महत्वपूर्ण शरीर प्राप्त झाल्यावर मनुष्य उध्दार करतो. उद्या करीन, उद्या करीन म्हणून तो टाळत असतो. माहित नाही केव्हा ये मानवशरीर सुटेल याचा भरवशा नाही. तो क्षणभंगूर आहे. जसे पाण्यातील बुडबुड्यासारखा केव्हा फुटेल याचा नेम नाही. या गोष्टीची जाणीव ठेवून मनुष्यानी ताबडतोब भगवंताची भक्ती केली पाहिजे, असे प्रतिपादन सुश्री महेश्वरी देवी यांनी केले.श्री हनूमान मंदिर म्हाडा कॉलनी, रामनगर भंडारा येथे आयोजित विलक्षण दार्शनिक प्रवचनात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'तमेव विदित्वाती मृत्यूमेती नान्य पन्या विद्यतेयनाय’ या वेद मंत्राची व्याखा करत सागितले की, त्याला जाणून हा यापासून उत्तीर्ण होऊ शकतो. तो म्हणजे कोण तर तो आहे सर्वश्रेष्ठ परब्रम्ह, या पासून म्हणजे मायापासून, तो म्हणजे जीव उत्तीर्ण होऊ शकतो. त्या शिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. परंतु भगवंताला जीव हा प्रत्यक्ष जाणू शकत नाही. याकरिता त्याला तांत्रीक ब्रम्हनिष्ठ महापुरुषाकडे जावे लागेल. त्याला जानण्यासाठी कोणता जीव सर्वश्रेष्ठ आहे. यासाठी हितोपनिदेय या ग्रंथात सांगितले की, अधिकार केवळ मानव प्राण्याला आहे. मानव आणि इतर प्राण्याच्या तूलनेमध्ये आहार, निद्रा, भय, मैथून साम्य आहे.फक्त मनुष विशेष ज्ञान शक्ती जी भगवंतानी दिली. त्याद्वारे मनुष्य आपले जीवन बनवू शकतो किंवा बिघाडू शकाते. म्हणजे कर्म करण्याचा अधिकार केवळ मानव योनीतच आहे. तो अधिकारी देवी, देवता यांना सुध्दा नाही. पुष्कळ पुण्य झाल्याने स्वर्ग मिळतो. परंतु स्वर्गातील सुख हे सीमित आहे. पुण्य संपल्यावर त्याला मृत्यू लोकतील कृमी, मांजराच्या जन्माला टाकले जाते. वाईट कर्म केल्यास नरक मिळत असतो. या दोन्ही कर्माच्या व्यतिरिक्त तिसरा कर्म केल्यास भगवंताची प्राप्त होते. जो मनुष्याचा अंतिम लक्ष्य आहे.यावेळी मार्ग परिक्रमा करण्यात आली. त्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. ज्यामध्ये विजय सिंगनजुडे, दयामरा भुते, अॅड. ठवकर, जगदीश कारेमोरे, कटरे, चौरागडे तथा म्हाडा कॉलोनीवासी उपस्थित होते.
मानव देह सर्वश्रेष्ठ आहे, क्षणभंगूर
By admin | Published: November 07, 2016 12:40 AM